advertisement

BMC Shiv Sena UBT: अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?

Last Updated:

BMC Shiv Sena UBT: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेचा गड सर केला असला, तरी पालिकेचा कारभार चालवताना त्यांना 'पावलोपावली' संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेचा गड सर केला असला, तरी पालिकेचा कारभार चालवताना त्यांना 'पावलोपावली' संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेत महापौर महायुतीचा बसणार असला तरी, प्रशासकीय नाड्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेच्या १८ पैकी ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याने अर्ध्या मुंबईच्या विकासकामांचे भवितव्य आता 'मातोश्री'वरून ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बहुमतात महायुती, तरीही ८ समित्यांवर ठाकरेंचा 'वचक'

मुंबई महानगरपालिकेत एकूण १८ प्रभाग समित्या आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी, वॉर्डनिहाय समीकरणे पाहता ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे नगरसेवक बहुमतात आहेत. याचा अर्थ असा की, रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे अधिकार या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांकडे असतील, जिथे ठाकरेंची सत्ता असेल. मुंबई महापालिकेच्या विकासकामात प्रभाग समिती महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील ८ प्रभाग समितीवर ठाकरेंचा प्रभाव असणार आहे. तर, ८ नगरसेवक असणाऱ्या एमआयएमकडे एक प्रभाग समिती असणार आहे. तर, प्रभागात समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे.
advertisement

महापौर विरुद्ध प्रभाग अध्यक्ष, संघर्षाची ठिणगी

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीचा महापौर जरी पालिकेच्या मुख्यालयात बसला, तरी स्थानिक पातळीवरील विकासकामांच्या फाईल्स मंजूर करताना त्यांना ठाकरेंच्या प्रभाग अध्यक्षांशी संघर्ष करावा लागणार आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाच्या विभागांमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याने महायुतीला प्रत्येक कामासाठी 'तडजोड' करावी लागण्याची शक्यता आहे.
advertisement

'मातोश्री'चा प्रभाव कायम

पालिकेत सत्ता नसतानाही अर्ध्या मुंबईवर वर्चस्व राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत. यामुळे आगामी काळात महापौरांच्या घोषणा आणि प्रभाग समितीची अंमलबजावणी यामध्ये मोठा राजकीय पेच पाहायला मिळू शकतो.

>> कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता

प्रभाग समिती (विभाग)वर्चस्व / सत्तामुख्य पक्ष / गट
A, B, Eमहाविकास आघाडीठाकरे गट (शिवसेना)
C, Dमहायुतीभाजप - शिंदे गट
F-दक्षिण, F-उत्तरमहाविकास आघाडीठाकरे गट
G-दक्षिणमहाविकास आघाडीठाकरे गट
G-उत्तरमहाविकास आघाडीठाकरे गट
H-पूर्व, H-पश्चिममहाविकास आघाडीठाकरे गट / काँग्रेस
K-दक्षिणमहायुतीभाजप - शिंदे गट
K-उत्तरमहाविकास आघाडीठाकरे गट
K-पश्चिममहायुतीभाजप
P-दक्षिणमहायुतीभाजप
P-पूर्व, P-पश्चिममहाविकास आघाडीठाकरे गट
R-दक्षिणमहायुतीभाजप
R-मध्य, R-उत्तरमहायुतीभाजप
M-पूर्व (गोवंडी)MIMएमआयएम (८ नगरसेवक)
M-पश्चिममहायुतीभाजप - शिंदे गट
L (कुर्ला)महाविकास आघाडीठाकरे गट
N (घाटकोपर)महायुतीभाजप
S (भांडुप) व T (मुलुंड)पेच (समसमान)चिठ्ठीवर निकाल ठरणार
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Shiv Sena UBT: अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement