Mumbai : 'फेसबुकवर मैत्री केली अन् ज्योतिष विद्या येते सांगून...', खरातनंतर मुंबईतही दोन भोंदू बाबांचं बिंग फुटलं
Last Updated:
Mumbai Crime News : मुंबईत सोशल मीडियावरून भोंदू ज्योतिष लोकांना जाळ्यात ओढत आहेत. मालाड आणि शीवमध्ये महिलांची लाखोंची फसवणूक झाली. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा फसवणुकीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : मुंबईसारख्या शहरात भोंदू ज्योतिषांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असताना दिसत आहेत. नागरिकांच्या अडचणींचा नेमका फायदा घेत हे बनावट बाबा खास करुन महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे उघड होत आहे. नुकताच मालाड आणि शीव परिसरातून असे दोन धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत.
धार्मिक विधींच्या नावाखाली भोंदू बाबाचा सापळा
मालाडमधील मालवणी परिसरात एका 36 वर्षीय विवाहित महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे. जिथं विवाहित महिला फेसबूकवरुन एका तरुणाच्या संपर्कात आली. त्याने स्वत:ला ज्योतिषी आहे असं सांगत विश्वास जिंकला. त्यानंतर भेटून पुजा-विधींच्या नावाखाली पैसेही घेण्यास सुरुवात केली.धक्कादायक बाब म्हणजे त्याने तिच्यासोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची वारंवार धमकी दिली. या भीतीनेते विवाहितेसोबत लैंगिक शोषण सुरु केले आणि पुन्हा-पुन्हा पैसे उकळले. यात विवाहितेने दागिने गहाण ठेवून आणि कर्ज काढून सुमारे 33 लाख रुपये त्याला दिले.
advertisement
शेवटी विवाहित महिलेला हा त्रास सहन न झाल्याने आत्महत्येचा निर्णय घेतला पण पतीने योग्य वेळी तिला वाचवले. पतीने विचारलं असता विवाहितने सर्व घडलेला प्रकार त्याला सांगितला. कोणतीही वेळ वाया न घालवता दोघांनी पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
जाहिरातीच्या नादी लागून तरुणी फसली भोंदूबाबाच्या जाळ्यात
दुसऱ्या प्रकरण हे शीव येथील 22 वर्षीय तरुणीसोबत घडलं आहे. जिथं तिला इस्टाग्रामवर जाहिरात दिसली. सर्व समस्या दूर करुन देण्यात येतील असे सांगत एका व्यक्तीने तरुणीशी संपर्क साधला. सुरुवातील विविध धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने 25 हजार रुपये घेतले. मग परत एकदा भीती दाखवून पैशांची अधिक मागणी केली. शेवटी घाबरलेल्या तरुणीने घरातील होते ते दागिने विकले आणि त्याला 16 लाख रुपये दिले. अखेर तरुणीला संशय आल्यावर स्वत:हा सायबर पोलिसांकडे जात तक्रार दाखल केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:15 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 'फेसबुकवर मैत्री केली अन् ज्योतिष विद्या येते सांगून...', खरातनंतर मुंबईतही दोन भोंदू बाबांचं बिंग फुटलं










