advertisement

Antibiotics : डॉक्टरांचं म्हणणं ऐका, गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा, भविष्यातले धोके होतील कमी

Last Updated:

अँटीबायोटिक्स घेणं लवकर बंद केलं तर त्याचा तुमच्या उपचारांवर थेट परिणाम होऊ शकतो. हा कोर्स पूर्ण केला नाही, तर काही रोग निर्माण करणारे जीवाणू तुमच्या शरीरात राहू शकतात. हे उरलेले जीवाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा तोच आजार होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : तब्येतीच्या तक्रारी असतात तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांच्या औषधांनी बरं वाटतं. पण काही जण डॉक्टरांनी दिलेली औषधं पूर्ण घेत नाहीत, त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. समजून घेऊया, डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करण्याचं महत्त्व.
तब्येत सुधारली की अँटीबायोटिक्स घेणं तुम्हीही थांबवत असाल तर ही माहिती महत्त्वाची. बरं वाटलं की कोर्स पूर्ण न करता अर्ध्यावरच सोडणं आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
अँटीबायोटिक्स घेणं लवकर बंद केलं तर त्याचा तुमच्या उपचारांवर थेट परिणाम होऊ शकतो. हा कोर्स पूर्ण केला नाही, तर काही रोग निर्माण करणारे जीवाणू तुमच्या शरीरात राहू शकतात. हे उरलेले जीवाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा तोच आजार होऊ शकतो.
advertisement
औषधोपचार बंद करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे दीर्घकालीन परिणाम. जे जीवाणू टिकून राहतात ते हळूहळू मजबूत होतात आणि औषधांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
यामुळे, तुम्ही परत आजारी पडाल तेव्हा उपचार करणं अधिक कठीण होईल कारण औषधं त्यांचं काम योग्यरित्या करू शकणार नाहीत.
advertisement
आरोग्य ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. म्हणून, जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला गोळ्या घेणं थांबवा असं सांगत नाहीत तोपर्यंत, अँटीबायोटिक्सचा संपूर्ण कोर्स पूर्ण करा. यामुळे तुम्हाला पूर्णपणे बरं वाटेलच पण भविष्यातील समस्यांपासूनही तुमचं रक्षण होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Antibiotics : डॉक्टरांचं म्हणणं ऐका, गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा, भविष्यातले धोके होतील कमी
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement