advertisement

Korean Skin Care : कोरियन स्किन केअर का असतं चर्चेत, साध्या सोप्या युक्त्या वापरा, तुमचाही चेहरा दिसेल सुंदर आणि फ्रेश

Last Updated:

आपलाही चेहरा कोरियन मुलींसारखा स्वच्छ, चमकदार दिसावा यासाठी त्यासाठी काय साहित्य लागतं आणि त्याचा वापर कसा करायचा समजून घेऊया. कोरियन स्किन केअरमधे सर्वात जास्त वापर होतो तांदळाच्या पाण्याचा.

News18
News18
मुंबई : जगभरात कोरियन स्किन केअरची कायम चर्चा असते. कोरियन मुलींची स्वच्छ, सुंदर त्वचा पाहिली की त्यावर दिसते चमक.
आपलाही चेहरा कोरियन मुलींसारखा स्वच्छ, चमकदार दिसावा यासाठी त्यासाठी काय साहित्य लागतं आणि त्याचा वापर कसा करायचा समजून घेऊया. कोरियन स्किन केअरमधे सर्वात जास्त वापर होतो तांदळाच्या पाण्याचा.
तांदळाचं पाणी - कोरियन मुलींच्या चमकदार त्वचेचं रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी. तांदळाचे पाणी घरी बनवता येते. रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवा. सकाळी या पाण्यानं चेहरा धुवा. तांदळाचं पाणी दररोज करता येतं. तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुण्यानं रंग उजळतो, डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते आणि चेहरा हायड्रेटेड राहतो.
advertisement
बार्ली टी - कोरियन लोक चहाऐवजी बार्ली टी पसंत करतात. त्यातल्या फायबरमुळे त्वचेला सुरकुत्या कमी येतात आणि त्वचेला चमक येते.
चेहऱ्याची स्वच्छता - कोमट पाण्यात एक मऊ कापड भिजवा आणि ते चांगलं पिळून घ्या. त्वचेवरील घाण काढून टाकण्यासाठी त्या कापडानं चेहरा आणि मान हळूवारपणे पुसा. कोरियन मुली दहा सेकंदांची युक्ती वापरतात. ही युक्ती म्हणजे चेहरा धुतल्यानंतर दहा सेकंदांच्या आत त्यावर टोनर लावणं, जेणेकरून चेहरा कोरडा होऊ नये.
advertisement
ग्रीन टी - ग्रीन टीचे औषधी गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. ग्रीन टी एक कप पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर या पाण्यानं चेहरा धुवा.
कोरियन फेस मास्क - कोरियन फेस मास्क भातापासून बनवला जातो. या मास्कमुळे चेहरा उजळतोच पण मृत त्वचा देखील काढून टाकली जाते. तांदळाचं पीठ कोरफडीच्या रसात मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटं ते वाळू द्या आणि नंतर चेहरा धुवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Korean Skin Care : कोरियन स्किन केअर का असतं चर्चेत, साध्या सोप्या युक्त्या वापरा, तुमचाही चेहरा दिसेल सुंदर आणि फ्रेश
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement