advertisement

Vomiting : उलट्या, मळमळ होण्याची कारणं समजून घ्या, उपचार करणं होईल सुलभ, उलटी रोखण्यासाठी आयर्वेदिक उपचार

Last Updated:

कधीकधी फक्त पोटदुखीमुळे उलट्या होतात तर कधीकधी एखाद्या गंभीर आजाराचं ते लक्षण असू शकतं. उलट्या होण्यामागची कारणं समजून घेणं आणि त्यानुसार योग्य उपचार करणं गरजेचं आहे. पाहूयात उलट्या होण्याची संभाव्य कारणं आणि उपचार.

News18
News18
मुंबई : काहींना संसर्गामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे उलट्या होतात. उलट्यांमुळे अस्वस्थ वाटतं. उलट्या होण्यामागे अनेक कारणं असतात. कधीकधी फक्त पोटदुखीमुळे उलट्या होतात तर कधीकधी एखाद्या गंभीर आजाराचं ते लक्षण असू शकतं. उलट्या होण्यामागची कारणं समजून घेणं आणि त्यानुसार योग्य उपचार करणं गरजेचं आहे. पाहूयात उलट्या होण्याची संभाव्य कारणं आणि उपचार.
पोटाच्या समस्या - सर्वात सामान्य कारणं म्हणजे पोटाच्या समस्या. पचनक्रिया बिघडणं, जळलेल्या किंवा जास्त मसालेदार अन्नामुळे पोट खराब होणं किंवा अन्नातील बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारा संसर्ग. याशिवाय गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा अन्नातून विषबाधा झाल्यानं उलट्या होऊ शकतात.
advertisement
कधीकधी डोकेदुखी किंवा मायग्रेनमुळे हा त्रास होऊ शकतो. जास्त ताण, चिंता, किंवा अचानक आलेला वास किंवा अन्नपदार्थ यामुळे देखील मळमळ होऊ शकते.
Dehydration :  उलट्या होण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे Dehydration किंवा शरीरात पाणी आणि खनिजांची कमतरता. विशेषतः मुलं आणि वृद्धांसाठी हे धोकादायक ठरु शकतं, कारण त्यांना अशक्तपणा लवकर जाणवू शकतो. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे महिलांमधे मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या होणं देखील सामान्य आहे.
advertisement
उलट्या टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेदात उलट्यांकडे अनेक प्रकारे पाहिलं जातं. वायू, पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे पोटाच्या समस्या जाणवू शकतात आणि उलट्या होऊ शकतात. आयुर्वेदिक उपायांमधे प्रामुख्यानं शरीराला हायड्रेट ठेवणं आणि हलकं अन्न खाणं हे दोन प्रमुख मुद्दे.
नारळाच्या पाण्यात थोडी वेलची पावडर घालून हळूहळू प्यायल्यानं पोट आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. आल्याचा चहा प्यायल्यानं मळमळ कमी होण्यास आणि पोट शांत होण्यास मदत होते. उकडलेले किंवा फुगलेले तांदूळ किंवा तांदळाचे पाणी यासारखं हलकं आणि सोपं अन्न देखील खूप फायदेशीर आहे.
advertisement
याशिवाय, शरीराचं इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी घरगुती ओआरएस म्हणजेच स्वच्छ पाण्यात, मीठ आणि साखर मिसळून बनवलेलं मिश्रण हळूहळू प्यावं.
या आयुर्वेदिक उपायांमुळे शरीरात अशक्तपणा कमी जाणवतो आणि शरीराला ताकद मिळते.
याव्यतिरिक्त, उलट्या होत असताना शरीराला विश्रांती देणं महत्वाचं आहे. जास्त जेवणं, जास्त पाणी पिणं किंवा तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. पाणी, नारळ पाणी किंवा हलकं सूप लहान घोटात पिणं चांगलं.
advertisement
लक्षात ठेवा की जर सतत उलट्या होत असतील, अत्यंत अशक्तपणा येत असेल किंवा शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vomiting : उलट्या, मळमळ होण्याची कारणं समजून घ्या, उपचार करणं होईल सुलभ, उलटी रोखण्यासाठी आयर्वेदिक उपचार
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement