Diabetes : Diabetes Reversal म्हणजे काय ? मधुमेह कायमचा कसा दूर करावा ? पाहूयात तज्ज्ञ काय म्हणतात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मधुमेहावर कोणताही इलाज नाही असं मानलं जातं. मधुमेह बरा होऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल, डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : मधुमेहाचं प्रमाण वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. भारतातला वेगानं वाढणारा हा आजार आहे. मधुमेह पटकन पाठ सोडत नाही. मधुमेहासह निरोगी राहण्यासाठी काहीजणांना आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात.
मधुमेहावर कोणताही इलाज नाही असं मानलं जातं. मधुमेह बरा होऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल, डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. मधुमेह कधीच अचानक होत नाही. प्रत्येक टप्प्यावर तुमचं शरीर याचे सिग्नल देत असतं.
advertisement
पहिला टप्पा म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. या टप्प्यात, रक्तातील साखर सामान्य असते, पण चयापचय वेग मंदावतो आणि खाल्ल्यानंतर झोप येणं, जडत्व जाणवणं, ब्रेन फॉग यासारखी लक्षणं जाणवतात.
दुसरा टप्पा म्हणजे प्रीडायबिटीस - या टप्प्यावर झोपेतून उठल्यावर सकाळी काहीही खाण्याआधी, म्हणजे फास्टिंग शुगर, रक्तातली साखरेची पातळी शंभरपेक्षा जास्त असणं आणि HbA1c 5.7 ते 6.4 दरम्यान असणं. या टप्प्यात, पोटाभोवती चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
advertisement
तिसरा टप्पा - याला early diabetes म्हणतात. ज्यात फास्टिंग शुगर 126 च्या वर आणि HbA1c 6.3 च्या वर असते. वारंवार भूक लागणं आणि वारंवार लघवी होणं ही लक्षणं जाणवू शकतात.
चौथा टप्पा म्हणजे - अनियंत्रित मधुमेह. या टप्प्यात औषधं देखील कुचकामी ठरतात आणि साखरेची पातळी नियंत्रित करता येत नाही. पायांना सूज येणं, बधीरपणा येणं आणि मुंग्या येणं अशी लक्षणं जाणवतात.
advertisement
पाचवा टप्पा - याला Complicated diabetes म्हणतात. या टप्प्यात, रक्तातल्या वाढलेल्या साखरेचा परिणाम रक्तवाहिन्या आणि नसा खराब करून शरीराच्या अवयवांवर होतो.
लक्षणं आणि शरीरावर होणारे परिणाम पाहता मधुमेह फक्त पहिल्या तीन टप्प्यातच बरा होऊ शकतो असं डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी त्यांच्या पोस्टमधे म्हटलंय. त्यामुळे तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 5:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : Diabetes Reversal म्हणजे काय ? मधुमेह कायमचा कसा दूर करावा ? पाहूयात तज्ज्ञ काय म्हणतात








