advertisement

Teeth Care : दातांच्या समस्यांवर प्राचीन काळापासूनच औषध, वज्रदंतीच्या फुलानं तुमची स्माईल होईल लय भारी

Last Updated:

वज्रदंती हे एक लहान, तरीही अत्यंत प्रभावी औषधी फूल. हिरड्यांना सूज येणं, दातदुखी, रक्तस्त्राव किंवा तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्या जाणवत असतील तर हे फूल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय समस्येच्या मुळावर हळूवारपणे काम करतं. 

News18
News18
मुंबई : वज्रदंती नाव आलं की आपल्याला आठवते विक्रो वज्रदंती टूथपेस्टची जाहिरात. जाणून घेऊया या फुलाचे उपयोग आणि वर्षानुवर्ष हे फुल दातांच्या आरोग्यासाठी का महत्त्वाचं आहे.
वज्रदंतीचं झाड म्हणजे आयुर्वेदात दात आणि हिरड्यांचा खरा मित्र मानलं जातं. ग्रामीण भागापासून ते आयुर्वेदिक औषधांपर्यंत, वज्रदंतीचा वापर शतकानुशतकं केला जात आहे.
वज्रदंती हे एक लहान, तरीही अत्यंत प्रभावी औषधी फूल. हिरड्यांना सूज येणं, दातदुखी, रक्तस्त्राव किंवा तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्या जाणवत असतील तर हे फूल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय समस्येच्या मुळावर हळूवारपणे काम करतं.
advertisement
हिरड्यांसाठी फायदेशीर - वज्रदंतीमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे हिरड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. दातांमध्ये साचणाऱ्या घाण आणि जंतूंमुळे हिरड्यांमधे सूज येते आणि वेदना होतात.
वज्रदंतीमुळे जंतू स्वच्छ करण्याचं आणि हिरड्या मजबूत करण्याचं काम सोपं होतं. याच कारणामुळे, वज्रदंतीचा वापर अनेक आयुर्वेदिक टूथपेस्ट आणि टूथ पावडरमधे केला जातो.
advertisement
तोंडाची दुर्गंधी - तोंडाची दुर्गंधी ही अनेकांना भेडसावणारी मौखिक आरोग्य समस्या आहे. या समस्येवर उपचार करण्यासाठी वज्रदंती देखील खूप उपयुक्त आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मारले जातात आणि श्वास घेताना फ्रेश वाटतं. दररोज सकाळी वज्रदंती असलेल्या टूथपेस्टनं दात घासल्यानं तोंडाची दुर्गंधी कमी होऊ शकते.
advertisement
प्राचीन काळात लोक वज्रदंतीची पानं किंवा फुलं वाळवून त्याची पावडर बनवत असत आणि त्यानी दात स्वच्छ करत असत.
दातदुखी - वज्रदंती दातदुखीपासून देखील आराम देते. दातांमधे थोडं दुखत असेल किंवा झिणझिण्या येत असतील तर वज्रदंतीमुळे सूज कमी होते. वज्रदंतीच्या नियमित वापरामुळे दात मजबूत होतात आणि हळूहळू हिरड्यांमधून रक्त येणं थांबतं. म्हणूनच वृद्ध नागरिक अजूनही वज्रदंतीला दातांच्या समस्यांवरचा एक विश्वासार्ह उपाय मानतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Teeth Care : दातांच्या समस्यांवर प्राचीन काळापासूनच औषध, वज्रदंतीच्या फुलानं तुमची स्माईल होईल लय भारी
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement