advertisement

Fruits : महागड्या फेशिअलपेक्षा फलाहार करा, नैसर्गिक उपायानं उजळून येईल चेहरा

Last Updated:

सुंदर दिसण्यासाठी, लोक अनेकदा महागडी सौंदर्यप्रसाधनं, क्रीम आणि विविध उपचार करतात, पण ही उत्पादनं त्वचेची वरवरची दुरुस्ती करतात. खरं सौंदर्य आतून येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य आहार आणि पोषण आवश्यक आहे. त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर आहारात या फळांचा समावेश नक्की करा.

News18
News18
मुंबई : जेवणाव्यतिरिक्त फलाहार तब्येतीसाठी महत्त्वाचा आहे. फळं केवळ निरोगी शरीरासाठीच नव्हे तर त्वचा चमकदार राहण्यासाठीही उपयुक्त ठरतात. प्रत्येकाला चेहरा फ्रेश दिसावा असं वाटत असतं.
सुंदर दिसण्यासाठी, लोक अनेकदा महागडी सौंदर्यप्रसाधनं, क्रीम आणि विविध उपचार करतात, पण ही उत्पादनं त्वचेची वरवरची दुरुस्ती करतात. खरं सौंदर्य आतून येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य आहार आणि पोषण आवश्यक आहे. त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर आहारात या फळांचा समावेश नक्की करा.
advertisement
केळी - केळी हे सर्वात स्वस्त आणि पौष्टिक फळांपैकी एक. यात जीवनसत्त्वं अ, B6 आणि क भरपूर प्रमाणात असतात. दररोज केळी खाल्ल्यानं त्वचा मॉइश्चरायझ होते आणि कोरडेपणा कमी होतो. यामुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. त्यातले अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
सफरचंद - त्वचा जास्त काळ तरुण ठेवण्यासाठी सफरचंद खाऊ शकता. सफरचंदांमधे फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे, मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी मदत होते.
advertisement
पपई - पपई त्वचेसाठी वरदान आहे. त्यात पपेन नावाचं एंजाइम असतं, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी याची मदत होते आणि नवीन त्वचा तयार करण्यास मदत करते. पपई खाल्ल्यानं डाग, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी होऊ शकतं.
संत्री - संत्री म्हणजे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. कोलेजन तयार करण्यासाठी याची मदत होऊ शकते. कोलेजन त्वचा मजबूत आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
advertisement
पेरु - पेरु हे सर्वात स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. दररोज पेरु खाल्ल्यानं शरीर आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fruits : महागड्या फेशिअलपेक्षा फलाहार करा, नैसर्गिक उपायानं उजळून येईल चेहरा
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement