Dhurandhar The Revenge : अखेर प्रतीक्षा संपली! धुरंधर 2 चा Teaser Out
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar : The Revenge Teaser Out : रणवीर सिंहच्या बहुप्रतीक्षित धुरंधर 2 चा टिझर समोर आला आहे. धुरंधर : द रिव्हेंज असं या सीक्वेलचं नाव आहे.
सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या धुरंधर फिल्मच्यी सीक्वेलचा टिझर अखेर आला आहे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी, रणवीर सिंहने चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं. त्याच्या पोस्टमध्ये त्याने दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी टिझर येईल असं सांगितलं. तेव्हापासून सगळेजण टिझर कधी प्रदर्शित होतो याची वाटच पाहत होते. अखेर हा टिझर आला आहे.
'ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी' अशा वाक्यासह अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचा टिझर पोस्ट केला आहे. धुरंधर फिल्मच्या सीक्वेलचं नाव धुरंधर 2 नाही तर धुरंधर : द रिव्हेंज असं आहे. रणवीर सिंहच्या धुरंधर फिल्मच्या दुसऱ्या भागाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
1 मिनिट 12 सेकंदाचा हा टिझर. टीझरची सुरुवात हमजा नाही तर जसकीरत सिंग रंगीपासून होते. लियारीच्या युद्धासाठी त्याला तयार करणारा त्याचा प्रशिक्षण आणि बदललेला लूक देखील दाखवण्यात आला आहे. टीझरमध्ये 14 सेकंदात हमजा त्याच्या लांब केसांसह फुल्ल टशनमध्ये एंट्री करतो. लियारीचा राजा बनल्यानंतर आधी फक्त रहमान डकैतकडे असलेली सर्व पॉवर त्याने मिळवली आहे.
advertisement
टीझरवरून स्पष्ट होतं की यावेळी, एकाच व्यक्तीबद्दल दोन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातील, ज्याचा हिंट पहिल्या भागाच्या शेवटी देखील देण्यात आला होता. रणवीर सिंहचा लूक प्रेक्षकांना अधिक आवडला आहे.
advertisement
डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेली धुरंधर फिल्म ज्यात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांची भूमिका आहे. या फिल्मने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला आहे.
धुरंधरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. IMDb नुसार, आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचं बजेट अंदाजे 250 कोटी रुपये होतं. पण जगभरात त्याने 1305.7 कोटींची कमाई केली. फक्त भारतातील कलेक्शनच 840.2 कोटी रुपये आहे. ज्यामुळे तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला.
advertisement
advertisement
धुरंधर फिल्म पाकिस्तानसह काही देशांमध्ये बॅनही करण्यात आली आहे. पण आता ती नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानात ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगवर आहे.
धुरंधरने जगभरात 1300 कोटी रुपये कमावले आहेत. हा रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही बनला आहे. या फिल्मनंतर प्रेक्षक आता 'धुरंधर : द रिव्हेंज' ही फिल्म 19 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे. फिल्मचा हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
Location :
Delhi
First Published :
Feb 03, 2026 12:35 PM IST









