NCP President Election: उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या दिवशीच 'त्या' पत्रावर सह्या, राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून मोठी उलथापालथ!
- Reported by:PRANALI KAPASE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
NCP Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना दावे-प्रतिदावे होत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे.
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला आहे. नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना दावे-प्रतिदावे होत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 'पक्षाचा अध्यक्ष पवारच राहणार' यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
advertisement
३० हून अधिक आमदारांचा पाठिंबा
सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवसापासून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील बहुतांश आमदारांनी सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी आमदारांनी एक विशेष सह्यांची मोहीम देखील सुरू केली असून, आतापर्यंत ३० हून अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला पत्राद्वारे पाठिंबा दर्शवला आहे.
advertisement
पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष 'पवार'च!
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी 'पवार' हेच नाव अध्यक्षपदासाठी असणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.' न्यूज १८ मराठी' ला मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवर या नावावर जवळपास एकमत झाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आहेत. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्रे सध्या त्यांच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
नेत्यांचा सुनेत्रा पवारांवर विश्वास
सध्याच्या परिस्थितीत सुनेत्रा पवार पक्षाला एकसंध ठेवू शकतात. उपमुख्यमंत्री पद आणि आता संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षपद यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे जातील, अशी चिन्हे आहेत. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी वाटचालीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP President Election: उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या दिवशीच 'त्या' पत्रावर सह्या, राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून मोठी उलथापालथ!









