TRENDING:

CBI च्या नावाने धमकी दिली, डॉक्टरला आला फेक कॉल अन् घडलं धक्कादायक कांड

Last Updated:

डॉ. छाया गौतम असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डॉ. छाया गौतम या जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ट मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनूप पासवान, प्रतिनिधी
सायबर क्राइम
सायबर क्राइम
advertisement

कोरबा : गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या देशात पाठवण्यात येणाऱ्या पार्सलचा उल्लेख करत आणि दिल्ली पोलीस, सीबीआयची भीती दाखवत एका व्यक्तीची तब्बल 5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेली व्यक्ती ही मानसोपचारतज्ज्ञ आहे.

डॉ. छाया गौतम असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्या छत्तीसगडच्या कोरबा शहरातील खरमोर येथील रहिवासी आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 9852758177 या नंबर मालकाच्या विरोधात तक्रार दाखल करुन घेत हे प्रकरण सायबर पोलिसांकडे दिले.

advertisement

उन्हामुळे चेहरा पडला काळा, फक्त एक काम करा, अभिनेत्रीसारखा चेहऱ्यावर येईल ग्लो

डॉ. छाया गौतम या जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ट मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याबाबत सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे प्रमुख सुमन पोया यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, एका पार्सलला मलेशिया ब्राऊन शुगर पाठवण्याच्या नावाने अज्ञाताने डॉ. छाया गौतम यांना कॉल केला. तसेच यावेळी कॉलवरील व्यक्तीने अनेक प्रकारचा संवाद साधल्यानंतर धमकी दिली. तसेच दिल्ली यायला सांगितले. पोलीस आणि सीबीआयची भीतीही दाखवली आणि डॉ. छाया गौतम यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 5470000 इतके रुपये उकळले.

advertisement

PHOTOS : नवव्या पिढीतील या कलाकाराचा बॉलिवूडमध्ये डंका, संजय लीला भन्साळी, प्रितम दासोबतही केलं काम

ब्लॅकमेल आणि पैसे उकळणाऱ्या व्यक्तीने छाया गौतम यांना व्हिडिओ कॉलही केला. तसेच हेसुद्धा सांगितले की, इतके सर्व झाल्यावरही त्यांच्या खात्याला लीगलाइज करुन दिले जाईल आणि त्यांचे पैसे वापस करुन दिले जातील. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी डॉ. छाया गौतम यांचे अकाऊंट होल्ड केले आहे. तसेच याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
CBI च्या नावाने धमकी दिली, डॉक्टरला आला फेक कॉल अन् घडलं धक्कादायक कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल