हत्या झालेल्या श्याम सुंदर कुशवाह (वय 55) यांची मुलगी इंदू कुमारीने हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 'हत्येच्या 4-5 तास आधी मी माझ्या वडिलांशी बोलले होते. मी त्यांना विचारले की ते ठीक आहेत का? त्यानंतर वडिलांचा आवाज डळमळीत होऊ लागला. त्यांनी त्याच आवाजात सांगितले - हो, मी ठीक आहे. तसंच सून सध्या जेवण बनवत आहे, पण मला जेवावेसे वाटत नाही. मला झोप येत आहे. मी झोपायला जात आहे. यानंतर सकाळी वडिलांच्या हत्येची बातमी आली', असं इंदू कुमारी म्हणाली.
advertisement
मृत श्याम सुंदर कुशवाह यांच्या मुलीने पुढे सांगितले, 'भावाचे लग्न 7 वर्षांपूर्वी 2018 मध्ये झाले. त्यानंतर तो आमच्यासोबत फक्त 2-3 महिने राहिला. त्यानंतर वहिनी भावाला तिच्या माहेरी घेऊन गेली. ते तिथे राहू लागले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला. ती कधीही पतीला इथल्या घरी घेऊन गेली नाही. 2022 मध्ये भावाची तब्येत बिघडू लागली. दरम्यान, मी वहिनीच्या माहेरी त्याला भेटायला गेले तेव्हा तिने मला मुलांना भेटू दिले नाही.'
'भावाने मला इथे आता राहावसं वाटत नाही, असंही मला सांगितलं होतं. पण वहिनीने भावाला माझ्यासोबत येऊ दिलं नाही. ती भावाला भूतबाधा करण्यासाठी एके ठिकाणी घेऊन गेली. जिथे ती दिलशादला भेटली. यानंतर दोघांमधला संपर्क वाढला, पण भावाच्या उपस्थितीमुळे ती दिलशादला भेटत नव्हती', असा आरोप बहिणीने केला.
'2022 मध्ये भावाचं निधन झालं तेव्हा वहिनी दिलशादला उघडपणे भेटायला लागली. हळूहळू दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. एक वर्षानंतर दिला दुसरा प्रियकर भुलाई मियाँ भेटला आणि तिघे एकत्र राहायला लागले', असा धक्कादायक दावा इंदू कुमारीने केला आहे.
'माझा भाऊ गेल्यावर ती तिच्या सासरच्या घरी अजिबात यायची नाही. एके दिवशी माझ्या भाचीने मला फोन केला, तिने सांगितले की आज आमच्या घरी एक काका आले होते. त्यांनी आम्हाला चॉकलेट दिले. तो आत्ता मम्मीसोबत कुठेतरी गेला आहे. तेव्हाच तिथे वहिनी आली आणि भाचीचा फोन हिसकावून घेतला आणि तो डिस्कनेक्ट केला', असं इंदू कुमारी म्हणाली.
पोलिसांनी सासऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी सून महिमाला अटक केली आहे. 'महिमा श्रावण असल्यामुळे तिच्या सासरच्या घरी आली होती. त्यादरम्यान, ती खूप शांत दिसत होती. ती फक्त तिच्या मुलाला सोबत घेऊन आली होती. तिने तिच्या मुलीला तिच्या माहेरी सोडले होते, कारण ती आम्हाला तिच्या आजीच्या घराबद्दल सर्व काही सांगायची, असं इंदू कुमारी म्हणाली.
बगाह एसपी सुशांत कुमार सरोज म्हणाले, 'तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे. हत्येचे कारण सुनेचे अवैध संबंध असल्याचे दिसून येते. याप्रकरणाचं गूढ उकलण्यासाठी तिघांचीही सखोल चौकशी केली जात आहे. तसंच एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. ही हत्या कधी आणि कशी करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे.'
