नेमकं घडलं काय?
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ शंकर डोंगरे यांचं घर आहे. रात्रीचं जेवण करून कुंटुंबातील सदस्य झोपण्यासाठी घराच्या स्लॅबवर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञातांनी दरवाजावरील कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाट तोडले आणि आतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 3 लाख 30 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
advertisement
आजचं हवामान: मराठवाड्यात उष्णतेची लाट, 72 तासांसाठी अलर्ट, संभाजीनगरमध्ये काय स्थिती?
पहाटेच्या सुमारास घर फोडल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पण हाती काहीच लागले नाही.
सीसीटीव्ही फेल
गावात एवढी मोठी चोरीची घटना झाली. परंतु, गावातील 14 सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत ती दिसली नाही. पांगरदवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात 14 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवत चोरट्यांनी घर फोडले आणि 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.