मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची एका तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत मुलाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. १६ जून रोजी मुलीचे वडील शेतात गेले होते. यावेळी घरी आई, बहीण आणि भाऊ होते. घटनेच्या रात्री १२ वाजता प्रियकर पीडित तरुणीच्या घरात घुसला. ‘तू माझ्याबरोबर चल, मला तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायचं आहे’, अशी बतावणी करून तो पीडितेला घेवून गेला. तेव्हा आरोपीचा एक मित्र त्याच्यासोबत होता.
advertisement
दोघंही तरुणीला घेऊन जवळे दुमाला रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये गेले. या ठिकाणी आरोपीचा दुसरा मित्र होता. इथं जाताच मुलीने लग्नाबद्दल लवकर बोल, मला घरी जायचं आहे, असं प्रियकराला सांगितलं. पण प्रियकराने तिला जाऊ दिलं नाही. तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने माझ्या मित्रांना देखील तुझ्यासोबत शरीर संबध ठेवू दे, अशी मागणी केली. प्रियकराची ही मागणी ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आरोपीच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला.
पण आरोपीने माझ्या मित्रांना शारीरिक संबध ठेवू दे, नाहीतर तुझ्या वडिलांना, चुलत्यांना जिवंत मारुन टाकेन, अशी धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या मुलीवर तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितलेस तर घरच्यांना जीवे मारुन टाकेन अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी मुलीला घरी आणून सोडलं. घाबरून पीडित मुलीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. पण नंतर तिने या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली.
मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून त्यांनी तातडीने ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.