नेमकं काय घडलं?
पश्चिम बंगालमधून आलेल्या एका दाम्पत्याची अल्पवयीन मुलगी धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे रोजी-रोटीसाठी आली होती. येथील योगेश राठोड या तरुणाने त्या मुलीला फूस लावून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ढोकी रस्त्यावरील राधिका बार आणि लॉजमध्ये तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ तयार केले. "हे व्हिडीओ सोशल मीडियावरून टाकून तुझी बदनामी करेन", अशी धमकी देऊन आरोपीने तिच्यावर अनेक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. मुलीने या अत्याचाराला विरोध केल्यानंतर, सदर व्हिडीओ मुलीच्या वडिलांना पाठवण्यात आले. हे धक्कादायक व्हिडीओ पाहून मुलीच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
advertisement
राजकीय दबावाला झुगारून तपास
याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 23) आरोपी योगेश राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत हे करत आहेत. सदर गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होऊ नये यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी मोठा दबाव आणला होता. मात्र, उपविभागीय अधिकारी सुरेशकुमार राऊत यांनी कोणताही दबाव न मानता स्वतः या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासात मुख्य आरोपीला सहकार्य करणारा त्याचा मित्र आणि फोटोग्राफर अनिल जाधव यांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींना पोलीस कोठडीनंतर लातूर न्यायालयातून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी लॉजचा मालक आणि मॅनेजर या दोघांनाही आरोपी केले आहे. लॉजचा मालक एका प्रतिष्ठित युवा संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत लंगडे असल्याचे नाव आहे. बारचा मॅनेंजर बाबुराव सगर यालाही आरोपी करण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी आरोपींना खूप प्रयत्न केले असल्याचीही चर्चा आहे.
हे ही वाचा : "भांडी का घासली नाही", म्हणत पेटला वाद अन् घरात सांडला रक्ताचा सडा; एकावर ब्लेडने सपासप वार!
हे ही वाचा : Barshi News: "तू मला आवडतेस" म्हणत मेहुण्याने हात धरला, केलं लज्जास्पद वर्तन; मेहुणीने दाखवलं धाडस अन् केली तक्रार!
