Barshi News: "तू मला आवडतेस" म्हणत मेहुण्याने हात धरला, केलं लज्जास्पद वर्तन; मेहुणीने दाखवलं धाडस अन् केली तक्रार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बार्शीत नात्याच्या पवित्रतेला गालबोट लावणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 29 जुलै रोजी दुपारच्या वेळी पती शेतावर गेले असताना, घरात...
बार्शी : नात्याच्या पवित्रतेला गालबोट लावणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत, मेहुण्यानेच आपल्या 33 वर्षीय मेहुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात एकटी मेहुणी पाहून साधली संधी
पीडित महिला आपल्या पतीसोबत शेती करून उदरनिर्वाह करते, तर तिची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. घटनेच्या दिवशी, म्हणजेच 29 जुलै रोजी, दुपारच्या वेळी तिचे पती शेतावर गेले होते आणि त्या घरी एकट्याच होत्या. हीच संधी साधून तिचा मेहुणा, संतोष दत्तात्राय पाटील, तिच्या घरात शिरला.
लज्जा उत्पन्न होईल असे केले वर्तन
घरात आल्यानंतर संतोषने "तू मला आवडतेस," असे म्हणत तिचा हात पकडला आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्याने पीडितेशी अंगाशी झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिला शिवीगाळ करत, "तुझी गावात बदनामी करेन," अशी धमकी दिली.
advertisement
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत तालुका पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी मेहुण्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संतोष दत्तात्राय पाटील याच्यावर गुन्हा नोंदवला असून संबंधित पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा : Satara News: "कोणालाही सांगू नकोस!", मित्राकडून अत्याचार, अल्पवयीन मैत्रीण 8 महिन्यांची गरोदर!
हे ही वाचा : "भांडी का घासली नाही", म्हणत पेटला वाद अन् घरात सांडला रक्ताचा सडा; एकावर ब्लेडने सपासप वार!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Barshi News: "तू मला आवडतेस" म्हणत मेहुण्याने हात धरला, केलं लज्जास्पद वर्तन; मेहुणीने दाखवलं धाडस अन् केली तक्रार!