Satara News: "कोणालाही सांगू नकोस!", मित्राकडून अत्याचार, अल्पवयीन मैत्रीण 8 महिन्यांची गरोदर!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
खटाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने आपल्याच अल्पवयीन मुलीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी दोनदा शरीरसंबंध ठेवले. मुलगी...
औंध, ता. खटाव : खटाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने आपल्याच अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या शरीरसंबंधातून अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोनदा ठेवले शारीरिक संबंध
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना खटाव तालुक्यातील एका गावातील शेतात घडली. अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. त्यानंतर त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही, या मुलाने तिच्याशी दोन वेळा शरीरसंबंध ठेवले.
"हा प्रकार कोणालाही सांगू नकोस"
या प्रकारानंतर त्याने मुलीला, "हा प्रकार कोणालाही सांगू नकोस," अशी धमकीही दिली. परंतु, या शरीरसंबंधातून अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, संबंधित अल्पवयीन मुलावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजात अल्पवयीन मुलांमधील संबंध आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
advertisement
हे ही वाचा : शासनाला 44 लाखांचा चुना! कोल्हापूरात बोगस कामगार नोंदणीचा 'महा'घोटाळा; 25 जणांवर गुन्हे दाखल
हे ही वाचा : सांगलीकरांनो, इकडे लक्ष द्या! पोस्टातील व्यवहार बंद असणारी खाती गोठणार, तातडीने KYC करा, नाहीतर...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Satara News: "कोणालाही सांगू नकोस!", मित्राकडून अत्याचार, अल्पवयीन मैत्रीण 8 महिन्यांची गरोदर!