शासनाला 44 लाखांचा चुना! कोल्हापूरात बोगस कामगार नोंदणीचा 'महा'घोटाळा; 25 जणांवर गुन्हे दाखल
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूरमध्ये बांधकाम कामगार कल्याण योजनेतून लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाला तब्बल 44 लाख 77 हजार रुपयांचा गंडा...
कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याण योजनेतून मिळणाऱ्या लाभासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाला तब्बल 44 लाख 77 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे, बनावट मृत्यू दाखले आणि इतर चुकीची प्रमाणपत्रे सादर करून ही फसवणूक करण्यात आली होती.
या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे (वय-34, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी मंगळवारी रात्री कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनंतर पोलिसांनी 25 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एजंट आणि बांधकाम कामगार दोघांचाही समावेश आहे.
कामगार अन् एजंट यांचे धाबे दणाणले
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगार कल्याण योजनांतर्गत अनेक लाभांची सुविधा दिली जाते. या लाभांसाठी बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता या घटनेतून समोर आली आहे. यापूर्वी राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने बांधकाम कामगार आणि एजंट यांच्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे योजनेंतर्गत वाढलेली गैरशिस्त आणि लाचखोरीचे प्रकारही समोर आले आहेत.
advertisement
फसवणुकीमुळे शासनाचे मोठे नुकसान
सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम कामगार कल्याण योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी काही व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली, तर काहींनी चक्क मृत व्यक्तींच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने दाखवून योजनांचा लाभ मिळवला. या सर्व अनियमितता आणि फसवणुकीमुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे ही वाचा : पत्नी, सासूला दगडाने ठेचून मारलं, मृतदेह पुरून लावली केळीची झाडं; थरारक हत्याकांड असं आलं समोर
advertisement
हे ही वाचा : लघुशंकेसाठी उतरला अन्..! दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा कुरियर बाॅयवर हल्ला; 70 लाखांचं सोनं केलं लंपास
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 9:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
शासनाला 44 लाखांचा चुना! कोल्हापूरात बोगस कामगार नोंदणीचा 'महा'घोटाळा; 25 जणांवर गुन्हे दाखल


