लघुशंकेसाठी उतरला अन्..! दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा कुरियर बाॅयवर हल्ला; 70 लाखांचं सोनं केलं लंपास
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मंगळवारी मध्यरात्री कराड तालुक्यातील वराडे गावाजवळ धक्कादायक घटना घडली. कोल्हापूरमधील कृष्णा कुरियर कंपनीचा कर्मचारी प्रशांत शिंदे...
कराड : मंगळवारी मध्यरात्री, कराड तालुक्यातील वराडे गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली. कोल्हापूरहून मुंबईला 70 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन निघालेल्या एका कुरियर बॉयला चोरट्यांच्या टोळीने भर रस्त्यात लुटले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बसमधून लघुशंकेसाठी उतरले अन्...
झाले असे की, कोल्हापूरमधील कृष्णा कुरियर कंपनीचा कर्मचारी प्रशांत शिंदे हे 70 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन मुंबईला निघाले होते. मंगळवारी रात्री ते कोल्हापूर ते मुंबई स्लीपर कोच बसने प्रवास करत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास बस वराडे गावाच्या हद्दीतील एका हॉटेलजवळ थांबली. सगळे प्रवासी खाली उतरले तसे प्रशांतही दागिन्यांची बॅग घेऊन लघुशंकेसाठी खाली उतरले. प्रशांत परत बसमध्ये चढत असतानाच, दबा धरून बसलेल्या चोरट्यांच्या टोळीने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण करत त्याच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांची बॅग हिसकावली आणि अंधाराचा फायदा घेऊन चोरटे फरार झाले.
advertisement
दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी हल्ला केला
या घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांतच राहुल दिनकर शिंगाडे (वय 28, रा. शिंगणापूर, ता. माण) नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याकडून इतर साथीदारांची नावे समोर आली आहेत. पोलीस आता त्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांना प्रशांत शिंदे दागिन्यांसह या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असावी. त्यामुळेच त्यांनी पाळत ठेवून संधी मिळताच हा हल्ला करून बॅग पळवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही थरारक लूट नेमकी कशी घडली आणि यात आणखी कोण सामील आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : पत्नी, सासूला दगडाने ठेचून मारलं, मृतदेह पुरून लावली केळीची झाडं; थरारक हत्याकांड असं आलं समोर
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 7:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
लघुशंकेसाठी उतरला अन्..! दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा कुरियर बाॅयवर हल्ला; 70 लाखांचं सोनं केलं लंपास