सांगलीकरांनो, इकडे लक्ष द्या! पोस्टातील व्यवहार बंद असणारी खाती गोठणार, तातडीने KYC करा, नाहीतर...

Last Updated:

पोस्ट ऑफिस विभागाने तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार नसलेली निष्क्रिय बचत खाती, पीपीएफ, एससीसीएस, किसान विकास पत्र आणि एनएससी खाती...

Post Office inactive accounts
Post Office inactive accounts
सांगली : पोस्ट ऑफिस विभागाने आता निष्क्रिय बचत खाती गोठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, अशी पीपीएफ, एससीसीएस, किसान विकास पत्र आणि एनएससी खाती गोठवली जाणार आहेत. खातेदारांनी तातडीने 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण करून आपली खाती सक्रिय करावीत, अन्यथा ती कायमची बंद होण्याची शक्यता आहे.
सध्या पोस्टाकडे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या योजनांमधील एकूण 11 लाख 73 हजार 102 खाती आहेत. यापैकी मोठ्या संख्येने खाती निष्क्रिय (बंद) अवस्थेत आहेत, असे दिसून आले आहे. अनेक खातेदार वेगवेगळ्या योजनांमध्ये खाती उघडतात, परंतु त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा केवायसीची पूर्तता न केल्याने ती खाती निष्क्रिय होतात. जिल्ह्यात निष्क्रिय खात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
advertisement
खाती निष्क्रिय होण्याची कारणे
डिजिटल पेमेंटचा वाढता वापर, ग्रामीण भागांतही बँकांच्या शाखांची उपलब्धता आणि एटीएमच्या वाढत्या प्रसारामुळे पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली आहे. यामुळे पोस्टाच्या काही सेवांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या कारणांमुळे अनेक खाती निष्क्रिय झाली आहेत.
खाते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
गोठवलेले किंवा निष्क्रिय झालेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी खातेदाराला पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल आणि आपल्या ओळखीचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स) व पत्त्याचा पुरावा म्हणून पॅनकार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून 'केवायसी'ची पूर्तता करावी लागेल. त्यानंतरच खाते नियमितपणे वापरता येईल.
advertisement
जून 2025 अखेर नोंद असलेली खातेदार संख्या (योजनेनुसार)
  • भविष्य निर्वाह निधी : 15695
  • सुकन्या समृद्धी : 96791
  • मासिक प्राप्ती योजना : 28600
  • आवर्ती ठेव : 662421
  • ज्येष्ठ नागरिक बचत : 17772
  • मुदत ठेव : 105282
  • बचत खाते : 228954
  • पेंशन खाते : 1361
  • महिला सन्मान : 16226
  • एकूण : 1173102
या आकडेवारीनुसार, आवर्ती ठेव आणि बचत खात्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर सुकन्या समृद्धी योजनेलाही जिल्ह्यात चांगली पसंती मिळाली आहे. मुलींच्या भविष्यासाठी बचत करण्याच्या हेतूने ही योजना लोकप्रिय ठरली असून, यात दरमहा किंवा वर्षातून रक्कम भरता येते. या निर्णयामुळे पोस्टाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि निष्क्रिय खात्यांचा भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. खातेदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली खाती अद्ययावत करावीत, असे आवाहन पोस्ट विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
सांगलीकरांनो, इकडे लक्ष द्या! पोस्टातील व्यवहार बंद असणारी खाती गोठणार, तातडीने KYC करा, नाहीतर...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement