advertisement

घडामोडींना वेग! शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याकडे रवाना होणार

Last Updated:

राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केला आहे.

News18
News18
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गट एकत्र येणार होते. मात्र त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला खिळ बसली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी विलीनीकरणापासून यूटर्न घेतला असून अशी काही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केला आहे. ते सध्या मुंबईत असून दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे. आता ते पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार आहे. त्यानंतर ते पुन्हा बारामतीला जाणार आहेत. बारामतीत ते पुढचे दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
शरद पवारांनी असं अचानक दौरा का रद्द केला? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीची चर्चा सुरू असताना असं अचानक पवारांनी दिल्ली दौरा रद्द केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं अशी मागणी समोर येत आहे. यासाठी अजित पवार गटाच्या आमदारांनी सही करून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्र दिलं आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हे नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घडामोडींना वेग! शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याकडे रवाना होणार
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement