Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 1 ऑगस्टला हे मार्ग बंद

Last Updated:

Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 1 ऑगस्टला काही मार्ग बंद राहणार आहेत.

Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 1 ऑगस्टला काही मार्ग बंद
Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 1 ऑगस्टला काही मार्ग बंद
पुणे: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जेधे चौक ते सारसबागदरम्यानचा बालाजी विश्वनाथ पथ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी हा आदेश जारी केला आहे.
शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये फायरब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे.
बंद रस्ते व बदललेले मार्ग
जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक मार्गे प्रवास करावा.
advertisement
सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक दांडेकर पुल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक या मार्गे वळविण्यात येईल.
जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे प्रवेश बंद राहील.
कात्रजहून येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळावे.
वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद असेल.
advertisement
राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक या मार्गाचा वापर करण्याचा सल्ला.
सावरकर चौक ते पुरम चौक दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पुल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
दांडेकर पुल ते सावरकर चौककडे जाणारी वाहतूक बंद राहील.
advertisement
दांडेकर पुल आणि सावरकर चौक येथील वाहतूक दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरु ठेवण्यात येईल.
निलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्वती गाव मार्गे वळवण्यात येईल.
वाहतूक शाखेने पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुकांच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून वाहनचालकांनी वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी शहरातील महत्त्वाचे मार्ग काही काळासाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 1 ऑगस्टला हे मार्ग बंद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement