पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगाच्या मुन्शी प्लॉट येथे राहणार्या अभिषेक शिंदेची गेल्या 24 जुलैला हत्या केल्याची घटना घडली होती. उमरगा येथील बायपास रोडलगत असलेल्या आरती मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ त्याचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठवून तपासाला सूरूवात केली.
advertisement
दरम्यान या हत्येच्या तब्बल 15 दिवसानंतर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे.या तीन महिलांनीच या तरूणाची हत्या केल्याची माहिता आहे. ही घटना प्रेम प्रकरण व व्हाट्सअप वर बदनामीकारक स्टेटस ठेवल्याचा राग धरून महिलांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
विशेष म्हणजे या तीनही महिला कालिका कला केंद्रात वास्तव्यास होत्या. याच कलाकेंद्रात चार दिवसांपूर्वा गोळी गोळीबाराची घटना देखील घडली होती. त्यामुळे या हत्येत कलाकेंद्राच कनेक्शन देखील तपासले जात आहे.तसेच या महिलांनी स्वतः तरूणाची हत्या केली का? हत्येची सुपारी दिली होती?या सर्व दिशेने पोलिसांनी तपास करत चौकशी सूरू केली आहे.
दरम्यान या प्रकरणी मृत तरूणांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी तीन महिलांविरोधात खुनाचा गुन्हा केला दाखल केला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू केला आहे. या प्रकरणात आता तरूणाच्या हत्येनंतर नेमकं काय सत्य समोर येतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.