TRENDING:

एक चूक अन् खेळ खल्लास, झोपलेल्या जागी 5 जण गाडले, खळबळजनक घटनेनं जालना हादरलं!

Last Updated:

Jalna Accident News: जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दिवसभर काम करून थकलेल्या पाच कामगारांवर मध्यरात्री काळानं घाला घातला आहे. या दुर्दैवी घटनेत पाचही जणांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या एका चुकीमुळे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावर पुलाचं काम सुरू आहे. हे काम करणारे कामगार याच परिसरात तात्पुरतं पत्र्याचं शेड उभारून राहतात. काल मध्यरात्री उशीरा एका दुर्दैवी घटनेमुळे यातील पाच कामगारांचा झोपलेल्या जागीच मृत्यू झाला आहे. हे पाचही कामगार पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते.

रात्री उशिरा याठिकाणी वाळूची खेप घेऊन डम्पर आला होता. काळोख असल्याने चालकाने कामगार झोपलेल्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा डंपर रिकामा केला. वाळूच्या वजनामुळे पत्र्याचं शेड कोसळलं आणि यातच 5 कामगारांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला. सर्व कामगार गाढ झोपेत असल्याने त्यांना स्वत:ला वाचवताही आलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे पहाट होईपर्यंत पाचही कामगारांचा अशाप्रकारे मृत्यू झालाय, याची कुणालाही कल्पना नव्हता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

भल्या पहाटे कामगारांनी उभारलेलं शेड दिसून आलं नाही. यामुळे इतर कामगारांनी संबंधित शेड शोधला असता, हे शेड वाळूखाली दबल्याचं कामगारांच्या लक्षात आलं. या घटनेची माहिती मिळताच पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाळूखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढलंय. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री गाढ झोपी गेलेल्या कामगारांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
एक चूक अन् खेळ खल्लास, झोपलेल्या जागी 5 जण गाडले, खळबळजनक घटनेनं जालना हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल