TRENDING:

आयकर विभागाने विचारले, ५० कोटी कुठे गेले? अंडी विक्रेत्या प्रिन्सचे उत्तर ऐकून सर्व जण उडाले

Last Updated:

मध्य प्रदेशातील दमोह येथील अंडी विक्रेत्या प्रिन्स सुमनला ५० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची प्राप्तिकर नोटीस मिळाली. तपासात दिल्लीतील बनावट कंपनीद्वारे त्याच्या ओळखीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील पथरिया येथे एका अंडी विक्रेत्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. रस्त्याच्या कडेला अंडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणाला प्राप्तिकर विभागाकडून एक नोटीस मिळाली. ही नोटीस पाहून त्याची झोपच उडाली. कारण या नोटीसमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचे स्पष्टीकरण मागितले गेले होते. एका छोट्या विक्रेत्यासाठी ही रक्कम ऐकून धक्का बसणारा प्रकार होता. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली आणि सर्वजण अचंबित झाले.
News18
News18
advertisement

अंडा विक्रेत्याचा कोट्यधीश?

पथरिया येथे प्रिन्स सुमन नावाचा तरुण अंडी विकून आपल्या कुटुंबाला चालवतो. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला प्राप्तिकर विभागाकडून एक नोटीस मिळाली. ज्यामध्ये ४९,२४,५७,२१७ रुपयांच्या आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मागण्यात आली होती.

ही नोटीस मिळताच प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला. मार्च २० तारखेला आलेल्या नोटीसमध्ये मागील दोन वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे बिल, चलन, वाहतूक दस्तऐवज आणि बँक स्टेटमेंट्स जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र प्रिन्ससाठी ही गोष्ट पूर्णपणे अकल्पनीय होती.

advertisement

त्याने आश्चर्य व्यक्त करत सांगितले, मी दिवसभर अंडी विकून फक्त २००-४०० रुपये मिळवतो. ५० कोटींची चर्चा ही स्वप्नवत वाटते. हा प्रकार घडताच त्याने त्वरित दमोहच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

बनावट कंपनीचा मोठा घोटाळा!

प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी धक्कादायक सत्य बाहेर काढले. प्रिन्सच्या नावाने दिल्लीमध्ये ‘प्रिन्स एंटरप्रायज’ नावाची बनावट कंपनी नोंदणीकृत करण्यात आली होती.डिसेंबर २०२२ मध्ये ही कंपनी दिल्लीच्या झंडेवालान भागात रजिस्टर करण्यात आली. या बनावट कंपनीसाठी जीएसटी क्रमांकही काढण्यात आला होता. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आल्यानंतर कंपनी अचानक बंद करण्यात आली. यामुळे स्पष्ट झाले की, प्रिन्सच्या ओळखीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

advertisement

सामान्य नागरिकांच्या नावावर गैरव्यवहार

हा प्रकार केवळ प्रिन्सपुरता मर्यादित नाही. मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये अनेक लोकांच्या नावावर बनावट कंपन्या उघडून पैशांची फसवणूक केली जाते. तपास यंत्रणांच्या मते, अशा फसवणुकीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य कागदपत्रांचा गैरवापर केला जातो. प्रिन्स म्हणतो, माझ्या नावाने हा सगळा गैरव्यवहार कसा झाला. मला काहीही माहिती नाही. मी फक्त माझ्या कुटुंबासाठी कष्ट करतो!

advertisement

तुमच्या नावावरही फसवणूक होऊ शकते!

कधीही आपले आधार किंवा पॅन कार्ड अज्ञात व्यक्तींना देऊ नका.

कोणत्याही अनोळखी वित्तीय व्यवहारांबाबत सतर्क राहा.

बँक आणि सरकारी कागदपत्रांवर नेहमी लक्ष ठेवा.

मराठी बातम्या/क्राइम/
आयकर विभागाने विचारले, ५० कोटी कुठे गेले? अंडी विक्रेत्या प्रिन्सचे उत्तर ऐकून सर्व जण उडाले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल