राजेश अचार्य असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याने ज्या कंपनीत काम केले, त्या कंपनीतील नोकरी गेल्यानंतर पैसे कमावण्यासाठी चक्क कंपन्यांच्या मोबाईल टॉवरवरील डिवाईस चोरणाचा उद्योग सुरू केला. या इंजिनिअर तरुणाला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीला बीड जिल्हातील आंबेजोगाई येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून आरोपीनं इतरही चार ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी, सांजा, मार्डी आणि मस्सा या गावातील विविध कंगन्यांच्या मोबाईल टॉवरवरील डिवाईस डिश, अँटेना चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा अधिक तपास पोलिसांनी केला असता संबंधित चोरी करणारा चोर इंजिनिअर असून त्याला या क्षेत्राचं ज्ञान असल्याची माहिती समोर आली.
advertisement
पोलिसांनी सापळा रचत आरोपी राजेश आचार्य याला बीडमधून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजेश हा पूर्वी रिलायन्स कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होता. परंतु, नोकरी गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्याने धाराशिव जिल्हातील येडशी, सांजा, मार्टी आणि मस्सा या ठिकाणी असलेल्या इंडस टॉवरवरील इंटरनेटसाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण चोरले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.