कोलकाता : सध्या देशात प्रत्येकाला आता ईडी हे नाव माहिती झाले आहे. यामुळे याचा अनेकदा दुरुपयोगही होऊन जातो. याबाबत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कहाणी पश्चिम बंगालच्या एका तरुणाची आहे. तो स्वत:ला ईडी अधिकारी असल्याचे सांगून सोशल मीडियावर मुलींशी मैत्री करतो. तसेच त्याची नोकरी पाहून मुलीचे कुटुंबीयही लग्नासाठी तयार होऊन जातात. लग्नाची तयारी सुरू होते. लग्नाची तारीखही ठरवली जाते. नातेवाईकांना आमंत्रणही पाठवण्यासाठी पत्रिकाही छापल्या जातात. पण, दरम्यान, मुलीच्या भावाला काहीतरी संशय येतो आणि तो कथित अधिकाऱ्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतो.
advertisement
एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी ही घटना कोलकात्या बिधानगर येथे घडली. बनावट ईडी अधिकाऱ्याचे नाव प्रदीप साहा असे आहे. तो सोनारपूर येथील रहिवासी आहे. तो ईडी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करायचा. सॉल्ट लेक सीजीओ कॉम्प्लेक्सच्या बाहेर याबाबत गदारोळ झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला सॉल्ट लेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये हात बांधून आणि गळ्यात बनावट ईडी ओळखपत्र लटकवून आणले.
हा आहे आरोप -
त्यांनी आरोप केला आहे की, ईडी अधिकारी असल्याचे भासवून हा व्यक्ती आपल्या कुटुंबातील मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीने कुटुंबाकडून पैसेही घेतल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला. सॉल्ट लेक येथील ईडी कार्यालयासमोर आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली. विरती येथे राहणाऱ्या एका मुलीशी त्याने सोशल मीडियावर संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी मैत्री करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि यानंतर आरोपी प्रदीप साहा याने स्वत:ची ईडी अधिकारी म्हणून ओळख करून देत मुलीला लग्नाचा प्रस्ताव मांडला.
बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या
मुलीच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली. पण नंतर मुलीच्या कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी सॉल्ट लेक ईडी कार्यालयात येऊन प्रदीप साहाची चौकशी केली तेव्हा त्यांना त्या नावाचा कोणताही अधिकारी काम करत नसल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी आरोपी प्रदीप साहा याला पकडून सॉल्ट लेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या ईडी कार्यालयात हजर केले. त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आरोपी प्रदीप साहाला मारहाण केली.
याबाबत मुलीच्या भावाने सांगितले की, प्रदीप नुकताच ईडी कार्यालयात 10 मिनिटांसाठी आला होता. त्यानंतर त्याला संशय आल्याने तो (प्रदीप) निघून गेल्यावर त्याने कार्यालयात जाऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी तिथे तैनात असलेल्या CISF जवानांना मुलीच्या भावाने या बनावट ईडी अधिकाऱ्याचा फोटो दाखवला. तेव्हा त्यांनी सांगितले की या नावाचा आणि चेहरा असलेला कोणीही येथे काम करत नाही, यानंतर हा खुलासा झाला. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
