बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या

Last Updated:

झपाट्याने बदलणाऱ्या हवामानात सामान्यपणे लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि कपड्यांबाबत बेफिकीर होतात. अशा परिस्थितीत या निष्काळजीपणामुळे अनेकदा त्यांचे नुकसान होते. निष्काळजपणामुळे त्यांना सर्दी, खोकला, ताप, संसर्ग आदी आजार होतात.

फाईल फोटो
फाईल फोटो
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी : सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीनंतर आता हवामानात बदल होऊ लागला आहे. मात्र, हवामानाचा बदलता ट्रेंड आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता यामुळे आता दिवसभरात थोडासा उकाडा जाणवत आहे. असे असताना या थंडीतही लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे या बदलत्या हवामानात काय काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
advertisement
वाराणसीच्या संतोषी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रितू गर्ग यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, झपाट्याने बदलणाऱ्या हवामानात सामान्यपणे लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि कपड्यांबाबत बेफिकीर होतात. अशा परिस्थितीत या निष्काळजीपणामुळे अनेकदा त्यांचे नुकसान होते. निष्काळजपणामुळे त्यांना सर्दी, खोकला, ताप, संसर्ग आदी आजार होतात.
या 5 गोष्टींची घ्या काळजी -
. बदलत्या हवामानात तुम्ही अजिबात गाफील राहू नये. उबदार कपड्यांचा योग्य वापर करावा. कारण यावेळी दिवसा सूर्यप्रकाशामुळे आराम मिळतो. मात्र, सायंकाळच्या सुमारास पुन्हा थंडी वाढते. म्हणून अशा परिस्थितीत लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
advertisement
. यावेळी आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्यावी. संपूर्ण जेवण झाल्यावरच घरातून बाहेर पडा आणि ऋतूनुसार फळे आणि भाज्यांचे सेवन करत रहा.
. बदलत्या ऋतूमध्ये भरपूर पाणी प्या. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात.
Vastu Tips : पर्समध्ये चुकूनही या 4 वस्तू ठेवू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
. या शिवाय या ऋतूत पुरेशी झोपही घेतली पाहिजे. पुरेशी झोपमुळे अनेक आजार दुरुस्त होतात. डॉ. रितू गर्ग यांनी सांगितले की, सर्वसामान्य माणसाने रोज 7 ते 8 तास झोप घ्यायला हवी.
advertisement
. तसेच हिवाळ्यात स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे ताप आणि इतर प्रकारचे आजार होतात, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement