सोनारासोबत फसवणुकीचा प्रकार मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुल (बीकेसी)मध्ये घडला आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या नावाने एका हिरे व्यावसायिकाकडून दोघांनी दोन कोटींचे हिरे बनावट पावतीच्या माध्यमातून लाटण्याचा प्रकार केला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध हिरा कंपनीच्या मालकाने बीकेसी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार हिरा कंपनीच्या मालकाने 31 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या हिरा कंपनीच्या मालकाचे नाव राजेशभाई लखानी असं आहे. राजेश यांनी सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि ब्रोकर विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
धवल पटेल आणि बकौषिक सुतारिया या दोघांनीही 'प्र लॅब डायमंड' आणि 'अमृत जेम्स' नावाच्या ग्राहक कंपन्यांच्या नावाने हिरे विक्रीस नेले. हे दोघेही त्या कंपनीमध्ये, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि ब्रोकर या पदावर कार्यरत आहेत. धवल आणि बकौषिकने त्या दोन्हीही कंपन्यांच्या नावाने तब्बल 2 कोटी 95 लाख 59 हजार 492 रूपये इतक्या किंमतींचे 4,959.49 कॅरेट वजनाचे लॅब ग्रोन हिरे विक्रीस नेले. परंतु त्या कंपन्यांना हिरे न देताच दुसऱ्याच कंपनीकडे हिरे विक्रीसाठी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिरा कंपनी मालकांनी दोघांवरही फसवणुकीचा आरोप केला आहे.
हिरा कंपनीचे मालक राजेशभाई लखानी यांनी दोघांवर ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत 05 सप्टेंबर ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान किरा डियाम एलएलपी कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह धवल पटेल व ब्रोकर कौषिक सुतारिया यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप आहे.
