सध्याच्या महागाईच्या काळात कमी किमतीत चांगल्या दर्जाचे फूड मिळणे कठीण झाले असताना खाओमोरने परवडणाऱ्या दरात फूड सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे भेट देताना दिसत आहे. संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते.
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोक, करतोय फायद्याची शेती, 3 महिन्यात दीड लाख कमाई
advertisement
इथे मोमोज, बर्गर, पिझ्झा, फ्राइज, चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न बॉल्स तसेच विविध स्नॅक्स उपलब्ध आहेत. ज्यात मोमोज हाफ प्लेट 60 रुपये तर फुल प्लेट 90 रुपयांना दिले जात आहेत. चिकन पॉपकॉर्न बॉल्स (15 पीस) अवघ्या 120 रुपयांना मिळत असून फ्राइजचे दर 100 ते 170 रुपयांपर्यंत आहेत. पिझ्झा केवळ 110 रुपयांपासून उपलब्ध असून चिकन सबवे 150 ते 200 रुपयांपर्यंत, तर वेज डिलाइट 140 ते 200 रुपयांपर्यंत दिले जात आहे.
स्वच्छता, दर्जेदार कच्चा माल आणि जलद सेवा ही खाओमोरची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे अनेक ग्राहक सांगत आहेत. कमी वेळेत ऑर्डर मिळणे आणि चवीत सातत्य राखले जाणे यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. कमी किमतीत विविध पदार्थांची उपलब्धता आणि दर्जेदार सेवेमुळे ‘खाओमोर’ हा लालबाग परिसरातील नव्या पिढीचा आवडता फूड स्पॉट बनला आहे.





