Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोक, करतोय फायद्याची शेती, 3 महिन्यात दीड लाख कमाई

Last Updated:

शेवंती, बिजली यासह विविध प्रकारच्या फुलांची लागवड ते करतात. त्यांनी 20 गुंठे क्षेत्रात बिजली या फुलाच्या वाणाची लागवड केली आहे.

+
शेतकऱ्याची

शेतकऱ्याची कमाल; 'बिजली' चे सोने गणेश आटोळे यांना फुलशेतीतून लाखोंचे उत्पन्न..! 

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील शेतकरी गणेश आटोळे यांनी फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे. ते 2010 पासून फुलशेती करत आहेत. शेवंती, बिजली यासह विविध प्रकारच्या फुलांची लागवड ते करतात. त्यांनी 20 गुंठे क्षेत्रात बिजली या फुलाच्या वाणाची लागवड केली आहे. अवघ्या एका महिन्यात त्यांनी 10 क्विंटल बिजली फुलांची विक्री केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत 1 ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे गणेश आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. तसेच कमी क्षेत्रात जास्त नफा देणारी बिजली फुलशेती कशी करावी, उत्पादन वाढीसाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
बिजली या फुलाच्या वाणाची ऑक्टोबर पासून ते जानेवारीपर्यंत लागवड करता येते. याबरोबरच शेवंती या वाणाची मार्चमध्ये लागवड करता येते. वेगवेगळ्या वीस गुंठ्यामध्ये दोन ठिकाणी एकूण एक एकर मध्ये बिजलीची लागवड केलेली आहे. यामध्ये 3500 बिजली रोपांची 4.5 बाय 2 वर ही लागवड आहे. ड्रीप द्वारे पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलं आहे. गेल्या एक महिनाभरापासून या शेतीतून उत्पादन सुरू झालेलं आहे. या कालावधीत 10 क्विंटल पर्यंत उत्पादन निघालं आहे. आणखी दीड महिन्यापर्यंत यातून उत्पन्न मिळेल.
advertisement
एक एकर बिजली शेतीमध्ये 30 ते 40 क्विंटल उत्पादन निघायला हवे, सध्यातरी या फुलांना 50 रुपये किलो पर्यंत बाजारात भाव आहे. याचप्रमाणे बिजली फुलांचा बाजार भाव स्थिर राहिल्यास खर्च वजा करून 1 ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल. बिजली फुलांची शेती सोप्या पद्धतीची आहे, तसेच या शेतीला जास्त खर्च देखील लागत नाही. तसं जर पाहिलं तर या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी असतो. त्यामुळे ही शेती फायदेशीर आहे, तरुण व इतर शेतकऱ्यांना देखील या शेतीत येण्यास काहीच हरकत नाही असे देखील आटोळे यांनी म्हटले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोक, करतोय फायद्याची शेती, 3 महिन्यात दीड लाख कमाई
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement