गोंदिया शहरात दिवाळीच्या रात्री फिरत असताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी अर्पित ऊर्फ बाबू उके यांची निर्घृण हत्या केली. मृत तरुणाचं वय (23) रा. आंबाटोली इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गोंदिया या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून ठार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपींना रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 24 तासात अटक केली.
advertisement
पोलिसांनी डब्लिंग कॉलनीजवळून हर्ष छवींद्र वाघमारे, अंकज सोहनलाल राणे ऊर्फ राणा यांना आणि प्रवीण सुनील मुटकुरे रेल्वे स्टेशन समोरुन अटक केली आहे. तरुणाची हत्या करुन हे तिघंही पसार झाले होते. पोलिसांनी यांचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याच्या तपासा संदर्भात आरोपीचा तत्काळ शोध घेऊन 24 तासात आरोपींना अटक केली. या हत्येमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्याने काहीसा उके कुटुंबियांना धीर मिळाला आहे.