TRENDING:

Google Gemini वापरकर्त्यांसाठी अलर्ट! ‘या’ ट्रिकने हॅकर्स चोरतायत तुमची पर्सनल माहिती, वेळीच सावध व्हा!

Last Updated:

तुमचा हा स्मार्ट मित्रच आता हॅकर्ससाठी तुमच्या खाजगी आयुष्यात शिरण्याचा दरवाजा बनू शकतो, अशी भीती सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे नेमकं कसं घडतं आणि तुम्ही सुरक्षित कसं राहायचं, हे जाणून घेणं प्रत्येक स्मार्टफोन युजरसाठी गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसची कामं असोत किंवा वैयक्तिक वेळापत्रक, आपण गुगलच्या 'Gemini' सारख्या स्मार्ट असिस्टंटवर पूर्णपणे अवलंबून आहोत. गुगलने अलीकडेच जेमिनीला तुमच्या 'कॅलेंडर'चा एक्सेस दिला आहे, जेणेकरून तो तुमच्या मीटिंग्स आणि इव्हेंट्स सहज मॅनेज करू शकेल. हे ऐकायला खूप सोयीस्कर वाटतं ना? पण, संशोधकांनी आता याच सोयीबाबत एक धोक्याची घंटा असल्याचं सांगत सगळ्यांना अलर्ट केलं आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

तुमचा हा स्मार्ट मित्रच आता हॅकर्ससाठी तुमच्या खाजगी आयुष्यात शिरण्याचा दरवाजा बनू शकतो, अशी भीती सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे नेमकं कसं घडतं आणि तुम्ही सुरक्षित कसं राहायचं, हे जाणून घेणं प्रत्येक स्मार्टफोन युजरसाठी गरजेचं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गुगल जेमिनी आता तुमच्या कॅलेंडरमधील अपॉइंटमेंट तपासू शकतो, तुमच्यासाठी फ्री स्लॉट शोधू शकतो आणि आगामी मीटिंग्सची माहिती देऊ शकतो. मात्र, सायबर सिक्युरिटी फर्म 'Miggo Security' च्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, जेमिनीला मिळालेल्या या सखोल प्रवेशाचा (Deep Access) फायदा हॅकर्स घेऊ शकतात. यामुळे तुमच्या प्रायव्हसीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement

तज्ज्ञांनी सांगितले की, हॅकर्स एका विशेष तंत्राचा वापर करत आहेत, ज्याला 'Indirect Prompt Injection' म्हणतात. हे तंत्र एखाद्या जाळ्यासारखं काम करतं. हॅकर्स तुम्हाला एक सामान्य दिसणारं गुगल कॅलेंडर इनवाइट (Invite) पाठवतात. या इनवाइटच्या डिस्क्रिप्शनमध्ये साध्या भाषेत असे काही सूचना लपवलेल्या असतात, ज्या सामान्य माणसाला कळत नाहीत, पण AI सहज वाचू शकतो. जेव्हा तुम्ही जेमिनीला विचारता, "माझं उद्याचं वेळापत्रक काय आहे?" तेव्हा जेमिनी संपूर्ण कॅलेंडर स्कॅन करतो. स्कॅनिंग दरम्यान, जेमिनी त्या संशयास्पद इनवाइटमधील लपवलेल्या सूचना वाचतो आणि गोंधळतो. यातून तुमची खाजगी माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होते.

advertisement

गुगलने काय पाऊल उचलले?

मिग्गो सिक्युरिटीने या धोक्याची माहिती दिल्यानंतर, गुगलच्या सुरक्षा पथकाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गुगलने ही सुरक्षा त्रुटी मान्य केली असून ती तातडीने दुरुस्त (Fix) केली आहे. मात्र, या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, AI शी संबंधित धोके आता केवळ कोडिंगपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते साध्या भाषेतील संवादातूनही उद्भवू शकतात.

advertisement

युजर्सनी काय काळजी घ्यावी?

अनोळखी इनवाइट्स टाळा: कोणाकडूनही आलेले अनोळखी कॅलेंडर इनवाइट्स स्वीकारू नका किंवा त्यावर क्लिक करू नका.

वेळोवेळी तपासा की तुम्ही तुमच्या AI असिस्टंटला कोणत्या गोष्टींचा एक्सेस दिला आहे. ज्या गोष्टींची गरज नाही, त्यांचा एक्सेस काढून टाका.

तुमचे गुगल ॲप्स आणि स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर नेहमी लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट ठेवा, कारण त्यात नवीन सुरक्षा पॅचेस असतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

तंत्रज्ञान जेवढं प्रगत होतंय, तेवढेच धोकेही वाढत आहेत. गुगल जेमिनी सारखे टूल्स आपले काम सोपे करतात हे खरे असले तरी, आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शेवटी आपलीच आहे. 'स्मार्ट' होण्यासोबतच 'सावधान' राहणे ही आजच्या काळाची गरज आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Google Gemini वापरकर्त्यांसाठी अलर्ट! ‘या’ ट्रिकने हॅकर्स चोरतायत तुमची पर्सनल माहिती, वेळीच सावध व्हा!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल