TRENDING:

Hingoli Crime : आधी प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा गेम केला, मग पोलिसांवर बनाव, अवघ्या 4 तासात बायको प्रियकराचं बिंग फुटलं

Last Updated:

हिंगोलीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका बायकोने अनैंतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
extra marital affiare
extra marital affiare
advertisement

Hingoli crime News : हिंगोलीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका बायकोने अनैंतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार तासात बायको आणि तिच्या प्रियकराच पितळं उघडे केलं. या घटनेची आता सर्वत्र चर्चा आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ही घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात शिवाजी पोटे हे एका शेतात सालगडी म्हणून कामाला होते.याच ठिकाणी असलेल्या आखाड्यावर ते त्यांच्या पत्नी मंगल आणि दोन मुलासह राहायचे.

शिवाजी यांचा मुलगा शिरडशहापूर येथील एका शाळेत शिक्षण घ्यायचा.त्यामुळे मुलाला शाळेत सोडायच्या निमित्ताने मंगल हिचे तिथे जाणे व्हायचे. दररोज शाळेत मुलाला सोडायला जात असल्याने तिचे मैत्री शाळेतील स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर ठोंबरे सोबत झाली होती.या मैत्रीचे पुढे जाऊन अनैंतिक संबंधात रुपांतर झाले होते.

advertisement

या घटनेची कुणकुण शिवाजी पोटे यांनी लागली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले होते.याच रोज रोजच्या वादातून मंगल यांनी शिवाजी यांचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला होता.यासाठी त्याने प्रियकर ज्ञानेश्वरकडून मदतही मागितली होती. आणि त्याने याला होकारही दिला होता.

ठरल्यानुसार 23 ऑगस्टला मध्यरात्री मंगलने प्रियकर ज्ञानेश्वर आणि शिवाजीला आखाड्याच्या बाहेर बोलावून घेतलं.त्यानंतर शिवाजीच्या डोक्यात लाकडामे वार करून त्याचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह नजीकच्या नाल्यात फेकून दिला होता.त्यानंकर मंगल आणि प्रियकर आपआपल्या घरी निघून गेले होते.

advertisement

सकाळी मंगलने मुलाला उठवून शिवाजी यांना शोधण्याचा कांगावा केला. त्यानंतर शेतमालकाचा भाऊ देखील आखाड्यावर आला.त्याने शोध घेतला असता शिवाजी यांच्या मृतदेह नाल्यात सापडला होता.त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती.पोलिासांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तपास सूरू केला होता.

advertisement

तपासा दरम्यान मंगल हिचे परपुरूषाशी संबंध असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती.या चौकशीत तफावत आढळत होती.त्यानंतर दोघांची एकत्रित चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबूली दिली होती.

या प्रकरणी तुकाराम मिरासे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिसांनी ज्ञानेश्वर ठोंबरे आणि मंगल पोटे यांच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे हा गुन्हा पोलिसांनी चार तासात उघड केला.

मराठी बातम्या/क्राइम/
Hingoli Crime : आधी प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा गेम केला, मग पोलिसांवर बनाव, अवघ्या 4 तासात बायको प्रियकराचं बिंग फुटलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल