advertisement

सुगंध आणि सौंदर्याचा अनोखा संगम, पुण्यात इथं भरलंय पुष्पप्रदर्शन, काय आहे खास? Video

Last Updated:

पुण्यासह देश-विदेशातील पुष्पप्रेमी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनाला भेट देत आहेत. निसर्गप्रेमींना रंग, सुगंध आणि सौंदर्याचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन यंदा विशेष आकर्षण ठरत आहे.

+
प्रदर्शन 

प्रदर्शन 

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस बॉटनिकल गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे पुष्पप्रदर्शन 27 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असून, पुण्यासह देश-विदेशातील पुष्पप्रेमी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनाला भेट देत आहेत. निसर्गप्रेमींना रंग, सुगंध आणि सौंदर्याचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन यंदा विशेष आकर्षण ठरत आहे.
एम्प्रेस गार्डनमधील या पुष्पप्रदर्शनाला सुमारे 150 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. ब्रिटिश काळातही येथे भव्य स्वरूपात पुष्पप्रदर्शने भरवली जात असल्याची नोंद आढळते. काही कालखंड वगळता, संस्थेने 1998 साली पुन्हा एकदा या प्रदर्शनाची परंपरा सुरू केली आणि तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन अधिकाधिक भव्य स्वरूप धारण करत आहे. आज हे प्रदर्शन केवळ पुण्यापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.
advertisement
यंदाच्या प्रदर्शनात 500 पेक्षा अधिक विविध व दुर्मिळ फुलांच्या प्रजाती पाहायला मिळत आहेत. गुलाबांच्या अनेक आकर्षक जाती, हंगामी फुले, सजावटीसाठी वापरली जाणारी दुर्मिळ फुले यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुमारे 3 लाखांहून अधिक फुलांचा वापर करून साकारण्यात आलेला भव्य फ्लोरल डिस्प्ले हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या फुलांच्या रचना पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत.
advertisement
एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापक प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सुमारे 70 ते 80 हजार नागरिकांनी या पुष्पप्रदर्शनाला भेट दिली होती. यंदा मात्र प्रदर्शनाबाबतचा वाढता उत्साह लक्षात घेता, सुमारे 1 लाखांहून अधिक पर्यटक भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परदेशातील विविध फुलांच्या प्रजाती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
advertisement
निसर्गाशी नाते जपणारे, सौंदर्याची अनुभूती देणारे आणि शहराच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारे ‘बड्स एन ब्लूम्स’ पुष्पप्रदर्शन हे पुणेकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरत असून, निसर्गप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सुगंध आणि सौंदर्याचा अनोखा संगम, पुण्यात इथं भरलंय पुष्पप्रदर्शन, काय आहे खास? Video
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement