IPL 2026 मध्ये विचित्र घडणार! MS Dhoni चं नाव घेत आर आश्विनने टाकला बॉम्ब, CSK च्या फॅन्सला हसावं की रडावं कळेना
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 R Ashwin On MS Dhoni : थालाचा माजी सहकारी आर अश्विनने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून धोनी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
IPL 2026 R Ashwin On MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून आता 5 वर्षे उलटली आहेत, तरीही त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत. चेन्नई सुपर किंग्सचा हा दिग्गज खेळाडू आता 44 वर्षांचा झाला असून, तो चक्क 19 व्या आयपीएल हंगामासाठी सज्ज होत आहे. विशेष म्हणजे, IPL 2026 सुरू होण्यापूर्वी तब्बल दोन महिने आधीच धोनीने रांचीमध्ये सराव सुरू केला आहे. त्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशातच आता आर आश्विनने मोठा बॉम्ब टाकलाय.
महेंद्रसिंग धोनीने 2019 पासून आतापर्यंत सहा आयपीएल हंगाम गाजवले आहेत. यंदाच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने संजू सॅमसनसारख्या मोठ्या नावांना संघात सामील केल्यामुळे, धोनी आता 'मेंटॉर' किंवा नॉन-प्लेइंग रोलमध्ये दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्याचा माजी सहकारी आर अश्विनने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून धोनी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
advertisement
अश्विनने ऑगस्ट 2025 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र तो आजही क्रिकेटमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतो. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर धोनीच्या नव्या भूमिकेबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अश्विनच्या मते, धोनी या हंगामात फिनिशरऐवजी एका वेगळ्याच अवतारात फलंदाजी करताना दिसू शकतो. धोनी नंबर तीनवर खेळताना दिसू शकतो, असं आश्विनने म्हटलं आहे.
advertisement
धोनीने रांचीत ज्याप्रकारे बॅटिंग सराव सुरू केला आहे, ते पाहता तो फक्त खेळणारच नाही तर चक्क तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, असं अश्विन म्हणाला आहे. पॉवरप्लेमध्ये येऊन आक्रमक फटकेबाजी करणारा 'एनफोर्सर' म्हणून धोनी यंदा चाहत्यांना चकित करू शकतो. इम्रान ताहिरचा उत्साह पाहून धोनीला देखील नवी ऊर्जा मिळाल्याचे अश्विनने नमूद केलं.
advertisement
दरम्यान, सीएसकेने यंदा नव्या दमावर विश्वास दाखवलाय. यंदा सीएसकेकडे ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे अशी तगडी फलंदाजी आहे. अश्विनच्या मते, जर धोनीने सुरुवातीला येऊन तुफानी बॅटिंग केली, तर कोणत्याही गोलंदाजाला या संघाला रोखणं कठीण जाईल. या नव्या रणनीतीमुळे चेन्नईचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे आता थाला आश्विनची भविष्यवाणी खरी ठरवणार का? असा सवाल विचारला जात आहे.स
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 12:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 मध्ये विचित्र घडणार! MS Dhoni चं नाव घेत आर आश्विनने टाकला बॉम्ब, CSK च्या फॅन्सला हसावं की रडावं कळेना








