advertisement

Wearing New Clothes : नवे कपडे न धुता घालणे खरंच योग्य आहे का? याचा आपल्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

Last Updated:
Wearing clothes without washing is right or wrong : नवे कपडे घेतल्यावर बहुतेकांना ते लगेच घालावेसे वाटतात. सण, समारंभ किंवा खास कार्यक्रमासाठी खरेदी केलेले कपडे थेट अंगावर चढवण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र हे नवे कपडे न धुता घालणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी नक्कीच पडलाच असेल. तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते.
1/9
तज्ज्ञ सांगतात की, बाजारातून आणलेले नवे कपडे थेट घातल्यास त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कारण हे कपडे फॅक्टरीतून ते दुकानापर्यंत अनेक टप्प्यांतून जातात. या प्रक्रियेत त्यावर विविध रसायने, धूळ आणि जंतू साचलेले असू शकतात. त्यामुळे कपडे एकदा तरी धुऊन घालणे आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.

2/9
कपडे तयार करताना त्यावर फॉर्मेल्डिहाइडसारखी रसायने आणि सिंथेटिक डाई वापरली जातात. यामुळे कपडे आकर्षक दिसतात, सुरकुत्या पडत नाहीत आणि रंग टिकून राहतो. मात्र ही रसायने थेट त्वचेच्या संपर्कात आल्यास खाज, पुरळ, रॅशेस किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते, विशेषतः संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी.

3/9
आजकाल कपडे मॉल किंवा शोरूममध्ये विकले जातात. तुम्ही खरेदी करण्याआधी ते कपडे अनेक लोकांनी ट्रायलसाठी घातलेले असतात. त्यामुळे त्या लोकांचा घाम, त्वचेवरील जंतू आणि बॅक्टेरिया कपड्यांवर राहू शकतात. हे जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाण्याचा धोका असतो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

4/9
कपडे फॅक्टरीतून निघाल्यानंतर ट्रान्सपोर्ट, गोदाम आणि दुकान अशा अनेक ठिकाणांहून जातात. या प्रवासात त्यावर बारीक धूळ आणि घाण साचते, जी डोळ्यांना दिसत नाही. मात्र हीच घाण त्वचेला त्रास देऊ शकते आणि अ‍ॅलर्जीचे कारण ठरू शकते.

5/9
लहान मुले आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी तर नवे कपडे न धुता अजिबात घालू नयेत. त्यांच्या त्वचेवर रसायनांचा परिणाम लवकर होतो. कपडे धुतल्याने त्यावरचा अतिरिक्त रंग, घातक घटक आणि रसायने निघून जातात, ज्यामुळे त्वचा सुरक्षित राहते.

6/9
कपडे धुतल्याने ते अधिक मऊ आणि आरामदायी होतात. नवीन कपड्यांमध्ये कडकपणा असतो, जो धुतल्यानंतर कमी होतो. त्यामुळे त्वचेवर ओळखडे लागणे किंवा घासण्याची शक्यता कमी होते. यामुळे कपडे घालणेही अधिक आरामदायी वाटते.

7/9
तज्ज्ञांच्या मते, कपडे सौम्य डिटर्जंटमध्ये धुणे सर्वात चांगले. विशेषतः पहिल्यांदा धुताना वेगळे कपडे वेगळे धुवावेत, जेणेकरून रंग गेल्यास तो इतर कपड्यांना लागणार नाही. यामुळे कपड्यांचा रंग आणि गुणवत्ता दोन्ही टिकून राहतात.

8/9
थोडक्यात सांगायचे तर, नवे कपडे न धुता घालणे ही सवय टाळलेलीच बरी. फक्त एका वेळच्या धुण्याने तुम्ही त्वचेवरील अ‍ॅलर्जी, खाज आणि संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी नवे कपडे घेतल्यावर, थेट घालण्याऐवजी आधी धुवा आणि मगच निर्धास्तपणे वापरा.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement