Unique Curry Recipe : पालक पनीरची अशी भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल! दिसायला आणि चवीला आहे भन्नाट..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Unique Palak Paneer Curry Recipe : आपण खातो ती भाजी पालकाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून बनवलेली असते. मात्र आज आम्ही तुम्हाला याचंच एक भन्नाट देखणं आणि चविष्ट व्हर्जन दाखवणार आहोत. आज आपण पालकाची भाजी एका वेगळ्या स्टाईलनं बनवणार आहोत.
मुंबई : पालक पनीरची भाजी आपल्यासाठी नवीन नाही. आपण नेहमी ती बनवत असतो किंवा हिटलमध्ये गेल्यावरही बहुतांश शाकाहारी लोक हीच भाजी मागवतात. आपण खातो ती भाजी पालकाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून बनवलेली असते. मात्र आज आम्ही तुम्हाला याचंच एक भन्नाट देखणं आणि चविष्ट व्हर्जन दाखवणार आहोत.
आज आपण पालकाची भाजी एका वेगळ्या स्टाईलनं बनवणार आहोत. ही रेसिपी sanjanas_kitchen78 या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया युनिक आणि टेस्टी पालक पनीरची भाजी कशी बनवायची.
युनिक पालक पनीर भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- तेल
- दालचिनी
- काळी मिरी
- लवंग
- वेलची
- कांदा
- आलं लसूण पेस्ट
advertisement
- टोमॅटो प्युरी
- मीठ
- हळद
- धणेपूड
- दही
- गरम मसाला
- कसुरी मेथी
- पालक
- पनीर
- बेसन
- ओवा
- काळी मिरी पावडर
- लाल तिखट
- सब्जी मसाला
युनिक पालक पनीर भाजी बनवण्याची पद्धत..
- ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ.
advertisement
- एका कढईमधे तेल घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची असे खडे मसाले टाका.
- त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून चांगले परता.
- नंतर आलं लसूण पेस्ट घाला आणि कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.
- त्यानंतर काश्मिरी लाल तिखट टाका.
- आता यामध्ये टोमॅटो प्युरी टाका आणि व्यवस्थित शिवाजवून घ्या.
advertisement
- नंतर यामध्ये मीठ, हळद, धणेपूड टाकून शिजवा.
- भाजीला क्रिमी टेक्शचर येण्यासाठी थोडं दही टाका.
- नंतर जेव्हा भाजीचे तेल वेगळे होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये गरम पाणी टाका.
- वरून गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून परत शिजवा.
- दुसरीकडे पालक बारीक चिरून घ्या आणि त्यामध्ये मीठ टाका.
- पालक प्लेटमध्ये काढून त्यातील जास्तीचे पाणी पिळून काढून घ्या.
advertisement
- आता या चिरलेल्या पालकामध्ये ओवा, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, हळद, कोणताही सब्जी मसाला टाका.
- आता यामध्ये तेल आणि बेसन टाकून मऊसूत कणिक बनवून घ्या.
- हा कणकेचा गोळा बटर पेपरवर पसरवून त्यावर पनीर किसून टाका.
advertisement
- नंतर ते फोल्ड करून त्याच्या कडा दाबून घ्या.
- आता हे स्टीमरमध्ये वाफवून घ्या.
- स्टीम झाल्यानंतर याचे अर्ध्या अर्ध्या इंचाचे तुकडे करा आणि ते उकळत्या ग्रेव्हीमध्ये टाका.
- आता झाकून 2 मिनिटांसाठी शिजवा आणि तुमची युनिक पालक पनीरची भाजी तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 9:48 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Unique Curry Recipe : पालक पनीरची अशी भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल! दिसायला आणि चवीला आहे भन्नाट..









