advertisement

Rubi Gemstone: नशीब चमकवणारे शुभरत्न! अंगठीत धारण केल्याचा 3 राशींना होतो जबरदस्त फायदा

Last Updated:

Rubi Gemstone: कोणाच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असतो, तेव्हा तज्ज्ञ माणिक्य घालण्याचा सल्ला देतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रत्नाचा प्रभाव वेगळा असतो, त्यामुळे माणिक्य सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. काही राशींसाठी हे वरदान ठरतं, तर काहींसाठी अडचणीचं..

News18
News18
मुंबई : वैदिक ज्योतिषामध्ये रत्नांना खूप महत्त्व आहे आणि रत्न शास्त्रानुसार माणिक्य (Ruby) हे रत्नांचा राजा मानलं जातं. हे रत्न थेट सूर्य ग्रहाचे प्रतिनिधित्व करतं. जसं सूर्याशिवाय सृष्टीत प्रकाश शक्य नाही, तसंच कुंडलीतील सूर्याची स्थिती माणसाचा मान-सन्मान, नेतृत्व आणि आरोग्य ठरवते. जेव्हा कोणाच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असतो, तेव्हा तज्ज्ञ माणिक्य घालण्याचा सल्ला देतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रत्नाचा प्रभाव वेगळा असतो, त्यामुळे माणिक्य सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. काही राशींसाठी हे वरदान ठरतं, तर काहींसाठी अडचणीचं. त्यामुळे हे रत्न घालण्यापूर्वी नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
माणिक्य धारण करण्याचे 5 फायदे खालीलप्रमाणे आहेत -
योग्य पद्धतीने माणिक्य घातलं तर ते ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करतं आणि तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघतं. जे लोक सारखे घाबरतात किंवा ज्यांना पटकन निर्णय घेता येत नाहीत, त्यांच्यासाठी माणिक्य एखाद्या वरदानासारखं आहे. हे घातल्याने आत्मविश्वास वाढतो आणि माणूस समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतो. माणिक्याचा थेट संबंध सत्ता आणि अधिकाराशी आहे, त्यामुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीचे मार्ग सापडतात, प्रशासकीय सेवेतील लोकांना याचा विशेष फायदा होतो.
advertisement
हे रत्न फक्त पैशांचाच फायदा करून देत नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे. मनातील नैराश्य आणि नकारात्मक विचार हे रत्न दूर करतं. रत्नशास्त्रानुसार, माणिक्य हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी लय गुणकारी आहे. ज्यांना पचनाचे त्रास आहेत, त्यांना सूर्याच्या या रत्नामुळे बराच दिलासा मिळू शकतो. तसेच कला, लेखन किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे रत्न लय भारी मानलं जातं.
advertisement
माणिक्य कोणी घालावं आणि कोणी टाळावं?
माणिक्य घालण्यापूर्वी राशीचा विचार करणं लय महत्त्वाचं आहे, कारण चुकीचं रत्न घातल्यास त्याचे उलटे परिणामही होऊ शकतात. रत्न शास्त्रानुसार मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी माणिक्य लय नशिबाचं ठरतं. कर्क आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिष्याचा सल्ला घेतल्यावरच हे रत्न घालावं. दुसरीकडे मिथुन, कन्या, तुला, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी माणिक्य घालणं टाळलेलं बरं.
advertisement
माणिक्य धारण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्र:
धारण करण्यापूर्वी रत्न पूर्ण विधीनुसार जागृत केलं जातं. रविवारी सकाळी अंघोळ केल्यावर अंगठी गंगाजल आणि कच्च्या दुधाने धुवून शुद्ध करून घ्या. त्यानंतर सूर्यदेवासमोर दिवा लावा आणि लाल चंदन किंवा फुलं अर्पण करा. मग रत्न हातात घेऊन सूर्याच्या या बीज मंत्राचा 108 वेळा जप करा:
advertisement
"ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः"
मंत्र जप पूर्ण झाल्यावर ही अंगठी अनामिका बोटात (Ring Finger) धारण करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rubi Gemstone: नशीब चमकवणारे शुभरत्न! अंगठीत धारण केल्याचा 3 राशींना होतो जबरदस्त फायदा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement