एखादी दुर्घटना किंवा गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेले बोटांचे ठसे अर्थात फिंगरप्रिंट गोळा केले जात असल्याचं आपण पाहतो. ही बायोलॉजिकल खूण गुन्हा आणि गुन्हेगार यांच्यातला एक दुवा असतो. दिल्ली पोलीस सध्या या पद्धतीवर जास्त विश्वास ठेवताना दिसतात. यामुळे गुन्ह्याची उकल होते आणि गुन्हेगाराला पकडलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा छडा यांमुळे लागला आहे.
advertisement
एका खळबळजनक दरोड्याची कहाणी अशीच आहे. घटनास्थळी असलेल्या थर्माकोल बॉक्सच्या चारही बाजूंना फिंगरप्रिंट्स होते; पण पोलीस गुन्हा पाहता चिंतेत होते. गेल्या वर्षी पडलेल्या दरोड्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती; पण फिंगरप्रिंट्समुळे पोलिसांना प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रमाणेच साउथ कॅम्पसमध्ये 17 वर्षांपूर्वी झालेला दरोडा आणि हत्येचा तपास पोलिसांनी फिंगरप्रिंट्सच्या आधारे केला. कीर्तीनगरमध्ये नोंदलेल्या एका दरोड्याच्या प्रकरणात घटनास्थळी चान्स प्रिंट्स घेतल्या गेल्या. हे ठसे नॅशनल डेटाबेसशी जुळले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर हे संशयित इतर गुन्ह्यांमध्येही सहभागी असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याचप्रमाणे 2016मध्ये साउथ कॅम्पसमध्ये एका हत्येच्या घटनास्थळी तीन चान्स प्रिंट घेतल्या गेल्या. हे ठसे नॅशनल फिंगरप्रिंट्स डेटाबेसशी मॅच झाले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला होता.
पोलिसांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या फिंगरप्रिंट ब्युरोची स्थापना 1987 मध्ये झाली. हा ब्युरो गुन्हे शाखेच्या विशेष आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करतो. एससीपी दर्जाचा अधिकारी त्याची जबाबदारी सांभाळतो. सध्या दिल्ली ब्युरोकडे 9 जिल्हा मोबाइल टीम आहेत. त्या तपासासाठी घटनास्थळी जातात.
एका आधिकाऱ्याने सांगितलं, की फिंगर प्रिंट्सची तीन भागांत वर्गवारी होते. गुन्ह्याच्या ठिकाणी बोटांचे ठसे सापडतात. ते उघड्या डोळ्यांनीही पाहू शकता. याशिवाय पायांचे काही ठसे स्पष्टपणे दिसू शकतात. पायांवर चिखल, हातावर रंग, ग्रीस, रक्त इत्यादी. यानंतर प्लास्टिक प्रिंट्स केल्या जातात. या थ्रीडी प्रकारच्या असतात. त्यात बटर, साबण किंवा मेणासारख्या गोष्टी असतात. सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष प्रिंट्स शोधणं होय. त्या शोधण्यासाठी खूप वेळ लागतो.
खरं तर फिंगरप्रिंट्स डेटामुळे पोलिसांचं तपासाचं काम काही प्रमाणात सोपं झालं आहे. 2022साठी अलीकडेच जारी करण्यात आलेल्या फिंगरप्रिंट्स इन इंडियाचा डेटा नॅशनल फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीमबद्दल माहिती देतो. दिल्लीत 3 लाख 74 हजार 061 जणांचा डेटाबेस आहे. गेल्या वर्षीपर्यंत फिंगरप्रिट्स ब्युरोने दोषी ठरलेल्या 1 लाख 19 हजार 611 जणांच्या बोटांचे ठसे घेतले होते.
याद्वारे दिल्ली फिंगरप्रिंट्स ब्युरोला अनेक स्लिप्स (ब्युरोकडे उपलब्ध प्रिंट्सद्वारे संशयिताच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती) प्राप्त झाल्या आहेत. 2269 फिंगरप्रिंट्स दोषी ठरलेल्या व्यक्तींच्या असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. त्यांच्यापैकी 1095 जणांच्या बोटांचे ठसे गेल्या वर्षीच घेण्यात आले होते. याशिवाय खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातल्या प्रिंट्सही मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आल्या आहेत.
फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी पुरावे शोधण्यासाठी 17,564 घटनास्थळांना भेट दिली. 2022मध्ये 1530 प्रकरणांमध्ये 5478 चान्स प्रिंट्स घेतले. चान्स प्रिंटमध्ये पाय, तळहात, बोटं, पायाची बोटं, शूज, चप्पल किंवा गुन्ह्याच्या ठिकाणी पडलेल्या इतर वस्तूंवरचे ठसे घेतले जातात. 2021च्या तुलनेत 2022मध्ये घेतलेल्या प्रिंट्सची संख्या 50 टक्के जास्त होती. याशिवाय ब्युरोने 137 परदेशी नागरिकांच्या बोटांचे ठसे घेतले. दिल्ली फिंगरप्रिंट ब्युरोने 2022मध्ये 45 प्रकरणांमध्ये 1191 ठसे घेतले. 14 प्रकरणांमध्ये ब्युरो तज्ज्ञ साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाले होते.
विशेष पोलीस आयुक्त (क्राइम) रवींद्र यादव यांनी सांगितलं की, `फिंगरप्रिंट्स विश्लेषण पद्धतीमुळे गुन्हेगार ओळखण्याचं तंत्र जास्त सक्षम झालं आहे. चान्स प्रिंट्सच्या माध्यमातून अनेक प्रकरणं उलगडली आहेत. दीर्घ काळापासून रखडलेल्या केसेस सुटल्या आहेत.`
फिंगरप्रिंट्सचा डेटाबेस पाहिला, तर 3,74,061 फिंगरप्रिंट्सचा डेटाबेस 2022मध्ये दिल्लीतून जमा केला गेला. गेल्या वर्षी दोषी ठरलेल्यांसाठी 1,19,611 फिंगरप्रिंट स्लिप जारी करण्यात आल्या होत्या. 2022मध्ये 1530 प्रकरणांमध्ये 5478 चान्स प्रिंट्स घेतल्या गेल्या. 2022मध्ये गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांच्या प्रिंट्सच्या संख्येत 57 टक्क्यांनी वाढ झाली.
घटनास्थळावरून घेतलेल्या प्रिंट्सवरून 2021मध्ये 1058 प्रकरणं तर 2022 मध्ये 1530 प्रकरणं उलगडली.
2022मध्ये फिंगरप्रिंट मॅचिंगद्वारे उघडकीस आलेली प्रकरणं पाहता त्यात किर्ती नगरमधील 17 वर्षांपूर्वीचं दरोडा प्रकरण, 2016मधल्या दिल्लीतल्या साउथ कॅम्पसमधल्या गूढ हत्या प्रकरणाचा समावेश आहे. तसंच 2022मध्ये करोल बागमधलं दरोडा प्रकरण चान्स प्रिंट्सच्या माध्यमातून उघडकीस आलं. 2022मध्ये दिल्लीच्या सदर बझारमध्ये घडलेली घरफोडीची घटना लाकडी टेबलावर असलेल्या चान्स प्रिंट्सद्वारे उलगडली.
रेकॉर्ड स्लिपमध्ये गुन्ह्याचा इतिहास समजावा म्हणून प्रिंट्सची नोंद करून ठेवली जाते. यावरून पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यास आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत होते.