TRENDING:

सोशल मीडियावरील Scam पासून वाचायचं असेल तर 'या' ट्रिक्स येतील कामी

Last Updated:

अशावेळी काय करावं आणि कसं सेफ रहावं याबद्दल काही टीप्स आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडिया आजकाल कोण वापरत नाही? लहांनांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वच लोक फेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडिया हे लोकांच्या मनोरंजनाचा भाग आहे. पण याच गोष्टीचा फायदा घेत स्कॅमर्स लोकांना गंडा घालतात. हे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला हुशार होण्याची आणि काही गोष्टींच पालन करण्याची गरज आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अशावेळी काय करावं आणि कसं सेफ रहावं याबद्दल काही टीप्स आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील.

सोशल मीडियावरील घोटाळे टाळण्यासाठी, तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत बोलणं टाळा, जरी बोललात तरी त्यांना तुमची खासगी माहिती पुरुवू नका.जे वापर्तेकर्ते तुम्हाला खोदून खोदून काही गोष्टी विचारत असतील तर अशा वापरकर्त्यांना ब्लॉक करा आणि त्यांची त्वरित तक्रार करा.

advertisement

सोशल मीडियावर अनेक बनावट खाती आहेत. अशा खात्यांशी जोडणे टाळा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संशयास्पद मेसेज किंवा लिंक मिळाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. कोणीही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करु नका.

घोटाळेबाज अनेकदा अतिशय आकर्षक ऑफर देतात ज्या अशक्य वाटतात. जर एखादी ऑफर खूप चांगली दिसली तर तो नक्कीच घोटाळा असेल.

कोणतीही माहिती अत्यंत काळजीपूर्वक शेअर करा. तुमचा बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.

advertisement

तुमच्या खात्याची गोपनीयता सेटिंग्ज योग्य ठेवा. तुमचा विश्वास असलेल्या लोकांनाच तुमच्या खात्यात प्रवेश द्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संशयास्पद मेसेज किंवा लिंक मिळाल्यास त्यावर क्लिक करु नका.

मराठी बातम्या/क्राइम/
सोशल मीडियावरील Scam पासून वाचायचं असेल तर 'या' ट्रिक्स येतील कामी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल