फटाके खरेदीवरुन पती पत्नीमध्ये वाद झाला आणि याच वादातून पतीने पत्नीची हत्या केली. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील या घटनेने दिवाळीच्या सणावर मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरबीत राहणाऱ्या एका मजूर दाम्पत्यामध्ये फटाके खरेदीच्या मुद्द्यावरून वाद झाला. नर्बेसिंग मेडा असे पतीचे तर भूरीबेन असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दिवाळीसाठी पतीने फक्त 500 रुपयांचे फटाके आणले होते. मात्र, घरी आल्यावर फटाके पाहून पत्नीला खूप राग आला. इतके सारे फटाके का आणले आहेत, असे पत्नीने विचारल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
advertisement
धनत्रयोदशीला पती-पत्नीनं केली हजारो रुपयांची खरेदी, पण नंतर अचानक घडलं कांड
हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यानंतर या वादाची परिणाम एका भयंकर घटनेत झाले. पती नर्बेसिंग याने पत्नीवर हल्ला केला. या ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली असून मृताच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
