जमुई : गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. कधी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या कारण देत तर कधी मुलाला पोलीस ठाण्यातून सोडवण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे.
बिहारच्या जमुई जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला फोन करुन सांगितले की, त्यांची मुलीच्या मैत्रिणी एका मंत्र्याच्या मुलासोबत वाईट कृत्य केले आहे. मी डीजीपी ऑफिसमधून बोलत आहे. जर तुम्हाला आपल्या मुलीला वाचवायचे असेल तर तुम्ही आता मला लगेच माझ्या खात्यावर 35 हजार रुपये पाठवा. तसेच जर तुम्ही पैसे पाठवले नाही तर मग तुम्ही तुमच्या मुलीला वाचवू शकणार नाही. यानंतर त्या दाम्पत्याची 25 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली.
advertisement
हे दाम्पत्य जमुई जिल्ह्यातील पिपराडीह येथील रहिवासी आहे. किशोर कुमार आणि त्यांची पत्नी सुनीता कुमारी असे या दाम्पत्याचे नाव आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. किशोर कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलवर कुणाचा तरी कॉल आला. फोन करणारा म्हणाला की, तो बिहारच्या डीजीपी ऑफिसमधून बोलत आहे. यानंतर म्हणाला की, मुलीच्या मैत्रिणीने एका मंत्र्याच्या मुलासोबत चुकीचे कृत्य केल्याने ती चांगलीच अडकली आहे. त्यांची मुलगी रडत आहे. त्यामुळे तुमच्या मुलीला वाचवायचे असेल तर लगेच 35 हजार रुपये पाठवा. तिला वाचवण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च होतील, तरच मुलगी वाचेल.
March Equinox : आज दिवस आणि रात्र समान, पण असं का?, जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण..
त्यांची मुलगी ही बाहेर राहून शिक्षण घेते. त्यामुळे या फोनमुळे हे दाम्पत्य चिंताग्रस्त झाले. यानंतर अनेकदा सायबर गुन्हेगारांचे फोन येत राहिले. त्यांनी पैशांची मागणीही केली. त्यांना काही समजण्याआधी किंवा कोणाशीही काही बोलण्याआधीच गुन्हेगारांनी त्यांच्यावर इतका दबाव टाकला की त्यांनी लगेच 25 हजार रुपये त्यांना ट्रान्सफर केले. थोड्या वेळाने जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला कॉल केला त्यानंतर सर्व घटना समोर आली.
मुलीने सांगितले की, असं काहीही घडलेलं नाही. तसेच ती कुठेही कोणत्याच प्रकरणात अडकलेली नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.