TRENDING:

Jalna Crime : सात वर्षाच्या बहिणीवर चुलत भावानेच हात टाकला, अत्याचाराच्या घटनने जालना हादरलं!

Last Updated:

जालन्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका सात वर्षीय बालिकेवर तिच्याच सख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jalna Crime News : जालन्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका सात वर्षीय बालिकेवर तिच्याच सख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास सूरू आहे.तसेच या घटनेने जालना हादरलं आहे.
Jalna Crime News
Jalna Crime News
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात एका सात वर्षाच्या बालिकेवर तिच्याच 14 वर्षीय सख्ख्या भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती पिडीत मुलीच्या आईला कळताच तिने तत्काळ तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे्. पण तेथील रूग्णालयाने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. यानंतर जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांनी देत मुलीवर उपचार सूरू केले आहेत.

advertisement

या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, पिंक मोबाईल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतेली होती.

यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी व आईचे जवाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या 14 वर्षीय चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

advertisement

लेकीच्या आत्महत्या आणि घाईघाईत अंत्यसंस्कार

जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Jalna Crime : सात वर्षाच्या बहिणीवर चुलत भावानेच हात टाकला, अत्याचाराच्या घटनने जालना हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल