शेरा सूर्यप्रकाश मलिक असं हत्या झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असं हत्या करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत नाईक तलाव परिसरात ही घटना घडली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. अनैतिक संबंधातून शेराची हत्या झाल्याचं प्राथमिक कारण तपासात समोर आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गितेश उके याचे शेरा मलिकच्या पत्नीसोबत मागच्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब ज्यावेळी शेराला समजली. त्यावेळी त्याने गितेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता. बायकोपासून लांब राहण्यास सांगितलं. मात्र, गितेशची काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
कोयत्याने गळ्यावर 11 ते 12 वार
शेरा मलिक आपल्याला ठार मारेल, या भीतीने गितेशने शेराच्या हत्येचा कट रचला. या कामात गितेशने त्याचा मित्र भोजराज कुंभारेची मदत घेतली. मुख्य आरोपीनं भोजराज याला शेरा मलिकची माहिती काढण्याचे काम सोपवले. भोजराजने शेरा घरी असल्याची खबर दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी शेराच्या घरी गेले. त्यांनी शेरा याला घराबाहेर बोलावले. यावेळी आरोपींच्या मनात काय सुरू आहे, याची पुसटशी कल्पनाही शेराला नव्हती. तो घराबाहेर येताच आरोपींनी त्याच्या गळ्यावर कोयत्याने 11-12 वार केले. शेरा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
