उधम सिंह नगर : मुलीच्या वागण्याने समाजात आमची बदनामी होत होती. तिला खूप समजावले. मात्र, तिने ऐकले नाही. अखेर आमची इज्जत वाचवण्यासाठी तिला मारुन टाकले अशी कबूली मुलीची हत्या करणाऱ्या पालकांनी दिली. उत्तराखंड राज्याच्या उधम सिंह नगर जिल्ह्यात ऑनर किलिंगची ही घटना घडली.
पहाडगंज परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शेजारी राहणाऱ्या विवाहित तरुणावर प्रेम झाले होते. दोन वर्षांपूर्वी मुलीच्या कुटुबीयांना ही बाब माहिती झाली. त्यांनी दोघांना रागावले. मुलीच्या कुटुबीयांनी तिला मारहाण केली तसेच भविष्यात कोणतेही संबंध न ठेवण्यास सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी तरुण या मुलीला गुपचूप भेटायला आला. ही बाब तिच्या आई वडिलांना माहिती झाली.
advertisement
यानंतर तरुणाने पळ काढला. मात्र, या घटनेनंतर धक्कादायक घटना घडली. आई वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि या हत्येच्या आरोपांपासून वाचण्यासाठी एक कहाणी रचली. मात्र, पोलीस सत्य समोर आल्यानंतर आरोपी आई वडीलांची हत्या करण्यात आली आहे.
रुद्रपुर येथील सीओ सदर निहारिका तोमर आणि पोलीस अधिकारी धीरेंद्र कुमार यांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. सीओने सांगितले की, आरोपी शफी अहमद और खातून हे रुद्रपुर पोलीस ठाण्याच्या पहाडगंज परिसरातील रहिवासी आहेत. शफी अहमद फळविक्रेता आहे. तर त्याचा मुलगा केरळमध्ये दुचाकींचा मेकॅनिक आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी हिचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्या दोघांना कुटुंबीयांनी रागवले होते. मुलीला मारहाणही केली होती. मात्र, तरीसुद्धा ती ऐकत नव्हती. दोघांनी तरीही प्रेमसंबंध काय ठेवले. दोन्ही एकमेकांना भेटायचे.
दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलीची आई खातून जहां सकाळी 4 वाजता उठली. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांची मुलगी ही बेडवर नाही. त्यांनी तिचा घरात शोध घेतला असता तेव्हा ती मिळून आली नाही. त्यानंतर तिने तिच्या पतीला ही बाब सांगितल्यावर दोघांनी आपल्या मुलीचा शोध घेतला. जेव्हा ते छताच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना कुणीतरी पळताना दिसले. अल्पवयीन मुलगी ही वर बांधलेल्या खोलीच्या बाहेर उभी होती. यावेळी तिला विचारले की, इथे का उभी आहे आणि छतावरुन कोण पळून गेला, त्यावर ती काहीच बोलली नाही.
तिला खाली आणून शफी अहमदने तिला मारहाण केल्यावर तिने सांगितले की, तोच मुलगा तिला भेटायला आला होता आणि ती त्याला भेटायला छतावर गेली होती. हे ऐकताच तिच्या वडीलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईनेही मुलीच्या ओढनीने तिचा गळा दाबला. यानंतर थोड्या वेळाने तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी योजना बनवली. त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले की, मुलीने वरच्या घरात गळफास करत आत्महत्या केली आणि आम्हाला शवविच्छेदन करायचे नसल्याने आम्ही पोलिसांना माहिती देऊ इच्छित नाही.
बटाट्याच्या शेतात लपवली दारू, पोलिसांनाही बसला धक्का, याठिकाणी नेमकं काय घडलं?
यानंतर आम्ही चर्चा करुन विचार केला मृतदेहाला त्यांच्या गावी म्हणजे उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बजवाला गावात ठिकाणी लावणे योग्य राहील. मात्र, पोलिसांना माहिती झाले तर आपण फसू शकतो. त्यामुळे शफीने एका नातेवाईकांच्या मदतीने गाडी मागवली आणि आम्ही मृतदेहाला घेऊन तिथे गेले. आम्ही तिला पुरत असताना त्याठिकाणी पोलीस आले. चेहऱ्यावर जखम आणि गळ्यावर निशाण पाहून पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पुन्हा रुद्रपूर येथे आले.
सीओ सदर निहारिका तोमर यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने गळफास घेतला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर मृताच्या आई वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला. आमच्या मुलीमुळे आमची समाजात बदनामी होत होती, त्यामुळे आम्ही तिची हत्या केली, असा कबुली त्यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
