बटाट्याच्या शेतात लपवली दारू, पोलिसांनाही बसला धक्का, याठिकाणी नेमकं काय घडलं?

Last Updated:

एका शेतकऱ्याने शेतात बटाट्याची लागवड केली होती. मात्र, बटाट्याचे पीक काढण्यासाठी खोदकाम केले असता बटाट्याच्या जागी दुसरीच वस्तू समोर आल्यानंतर शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

शेतातील दृश्य
शेतातील दृश्य
आलोक कुमार, प्रतिनिधी
गोपालगंज : एका शेतकऱ्याने शेतात बटाट्याची लागवड केली होती. मात्र, बटाट्याचे पीक काढण्यासाठी खोदकाम केले असता बटाट्याच्या जागी दुसरीच वस्तू समोर आल्यानंतर शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
या शेतामध्ये असे काही लपवले होते, ज्याचा माणूस तर काय पण श्वान पथकही शोध लावू शकला नाही. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्या शेतात खोदकाम सुरू केला. मात्र, यावेळी खोदकामानंतर अशी वस्तू समोर आली, ज्या वस्तूला ठेवणे बेकायदेशीर आहे.
advertisement
गोपालगंज जिल्ह्यातील जादोपुर पोलीस ठाणे हद्दीतील चतुरबगहा गावात हा प्रकार पाहायला मिळाला. इथे पोलिसांच्या पथकाने शेतात खोदकाम केले असता पोलिसांना बटाटे पिकाच्या ऐवजी त्या शेतातून दारू सापडली. बिहारमध्ये दारूवर बंदी आहे. तसेच दारूचा वापर आणि व्यापार पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे असताना हा प्रकार घडल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.
बिहारमध्ये दारू बंदी असताना दारू व्यवसायाशी संबंधित लोक दारू तस्करीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. कधी वाहनांमध्ये तळघर बनवून दारूचा व्यापार केला जात आहे तर कधी रुग्णवाहिका, पोलिसांच्या वाहनांना टॅग लावून दारूची वाहतूक केली जाते. मात्र, गोपालगंजमधील दारू तस्करांनी दारू लपवण्यासाठी अशी जागा निवडली, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.
advertisement
जादोपुर पोलीस ठाण्याचे प्रमुख विकास कुमार पांडेय यांनी सांगितले की, चतुरबगहा परिसरात सातत्याने दारूचा व्यवसाय सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. दारू तस्कर दारू शेतात पुरतात आणि नंतर त्याचा पुरवठा करतात. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर एसपी स्वर्ण प्रभात यांच्या सूचनेवरून छापा टाकणारी पथके तयार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्या शेतात खोदण्यास सुरुवात केली. या कालावधीत पोलिसांनी 583 लीटर दारू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
photos : 9 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत कुचायकोट पोलीस ठाणे हद्दीतील खैरटवाहून उपेंद्र यादव यांना अटक केली आहे. दारू सिंडिकेटमध्ये याचा सहभाग सांगितला जत आहे. दारू तस्करीची ही पद्धत उघडकीस आल्यानंतर आता पोलीस आणि स्थानिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
बटाट्याच्या शेतात लपवली दारू, पोलिसांनाही बसला धक्का, याठिकाणी नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement