photos : 9 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू

Last Updated:
मुली आणि महिलांना स्मशानात जाण्यासाठी परवानगी नाही. मात्र, एका व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या 9 मुलींनी समाजाच्या परंपरा मोडल्या. त्यांनी आपल्या वडिलांना परंपरेनुसार मुखाग्नीसुद्धा दिला. यावेळी हे दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. (अनुज गौतम, प्रतिनिधी)
1/7
मध्यप्रदेशातील सागर येथे ही घटना घडली. निवृत्त पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र अहिरवार हे सागर उपनगरातील मक्रोनिया येथील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राहत होते. त्यांना मुलगा नाही. तर फक्त नऊ मुली आहेत.

advertisement
2/7
या मुलांना हरिश्चंद्र यांनी मुलांप्रमाणे वाढवले. यातील 7 मुलींचे लग्न झाले होते. तर दोन मुलींचे लग्न बाकी आहे. दरम्यान, अचानक त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

3/7
निवृत्त एएसआय हरिश्चंद्र यांना मुलगा नव्हता. त्यामुळे वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलींनी एकत्र येऊन अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला.

4/7
या सर्वांनी अंत्ययात्रेला सोबत घेऊन मुलाप्रमाणे मुक्तिधाम येथे अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

5/7
वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींपैकी दोन मुलींचे लग्न राहिले आहे. रोशनी आणि गुडिया या मुली अविवाहित असून त्यांच्या लग्नाची जबाबदारी आता या 7 बहिणींवर आहे. आता या 7 बहिणी आपल्या दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी वडिलांचे कर्तव्य पार पाडणार आहेत.

6/7
नातेवाईक छोटेलाल अहिरवार यांनी सांगितले की, मुलींनी हिंदू रितीरिवाजानुसार वडिलांना खांदा दिला आणि इतर विधी पार पाडले. यावेळी समाजातील लोकांनी अभिमानाने सांगितले की, मुलेच सर्वस्व नसतात.

7/7
त्यांची मुलगी वंदना यांनी सांगितले की, वडिलांचे आम्हा सर्वांवर खूप प्रेम होते. आम्हाला भाऊ नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत अनिता, तारा, जयश्री, कल्पनना, रिंकी, गुड़िया, रोशनी, दुर्गा या सर्व बहिणींनी एकत्र येत आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. हे दृश्य पाहून यावेळी अनेकांचे डोळ्यात अश्रू आले होते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement