केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड वरील घराला बॉम्बे उडवण्याची धमकी आल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. याचबरोबर धमकीनंतर पोलिसांच्या बॉम्ब स्कॉडने घराची तपासणी केली. यानंतर घरात कोणताही बॉम नसल्याचे आढळून आलं आहे. यानंतर फोन करणाऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. परंतु हा आरोपी फोन करण्यामागचे कारण काय होते हे स्पष्ट झाले नाही.
advertisement
धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव उमेश राऊत असं आहे. आरोपी हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाड्याने राहतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र रूम पार्टनर म्हणून सुद्धा राहतो. हे दोघेही मेडिकल चौकातील एका देशी दारूच्या भट्टीवर काम करतात.
नक्की फोन केला कोणी?
उमेश राऊत नामक व्यक्तीच्या कॉल आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने माझा फोन माझ्या मित्राने घेतला होता. त्याने कोणाला कॉल लावला याची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मात्र खबरदारी म्हणून या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
आज सकाळी 112 वर कॉल आला होता "गडकरी यांचा घरात बॉम्ब फुटणार आहे अस सांगण्यात आले. त्यानंतर फोन करणाऱ्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचा फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संशयित आरोपी उमेश राऊत याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची माहिती समोर आली आहे.