शादीडॉटकॉमवरून फसवलं 8 जणांना
समीरा ही शादीडॉटकॉम (Shaadi.com) सारख्या मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर करून 'हनी ट्रॅप' रचत होती. तिने एकटीने 8 जणांची फसवणूक केली होती. दीड वर्षांपासून गिड्डीखदान पोलीस तिच्या मागावर होते, पण ती सतत पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणाहून अटक करण्यात आले. या घटनेची माहिती वकील फातिमा पठाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाने समीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
आत्तापर्यंत कोट्यवधींना घातलाय गंडा
समीरा फातिमा, जी 'लुटेरी दुल्हन' या नावाने ओळखली जात होती, ती सोशल मीडियावर स्वतःला 'घटस्फोटित' (divorced) असल्याचे भासवत असे. श्रीमंत पुरुषांशी ओळख करून ती त्यांच्याशी लग्न करायची आणि नंतर त्यांची फसवणूक करायची. आतापर्यंत तिने तब्बल 8 पुरुषांशी लग्न करून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.
फसवणूक झालेले सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती
तिच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे, ज्यात भिंवडीचे हँडलूम व्यावसायिक इम्रान अन्सारी, मोमिनपुरा येथील शिक्षक नजमूज साकीब, रहेमान शेख, परभणीतील शिक्षण संस्थेचे मिर्झा अशरफ बेग, कंपनी मॅनेजर मुदस्सीर मोमिन, बँक मॅनेजर मोहम्मद तारीक अनिस, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अमानुल्लाह खान आणि रिअल इस्टेट व्यावसायिक गुलाम गौस पठाण यांचा समावेश आहे.
लग्नानंतर काही काळ संसार थाटल्याचे नाटक केल्यानंतर, समीरा त्या पुरुषांना पोलीस कारवाईची धमकी देऊन 'सेटलमेंट'साठी दबाव आणायची. तिच्या या जाचाला कंटाळून अनेक पीडितांनी पोलीस आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा तिचे हे सर्व कारनामे उघडकीस आले. या पत्रकार परिषदेला मुदस्सीर मोमिन, मोहम्मद तारीक अनिस आणि गुलाम गौस पठाण हे तीन पीडितही उपस्थित होते.
हे ही वाचा : Crime News : एवढा क्रुरपणा येतो कुठून? लहान भावा-बहिणींना घरात घुसून जिवंत जाळलं, घटनेने देश सुन्न
हे ही वाचा : 4 वर्षे फायदा उचलला, लग्नाचा विषय येताच डांबून मारलं, संभाजीनगरमध्ये प्रेयसीसोबत क्रूरतेचा कळस!